जत,प्रतिनिधी : बिंळूर (ता.जत)येथील अल्पवयीन मुलीला पळून नेहणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या पथकाने कराड (जि.सातारा) येथून ताब्यात घेतले.विलास कृष्णा सोनलकर (वय-21,रा.बिंळूर)असे सशयिंत आरोपीचे नाव आहे. घटना 29 मार्च 2019 रोजी येथे घडली होती. याबाबत जत पोलिसात मुलीच्या आई-वडीलांनी अपहरणांची फिर्याद दिली होती.त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.तपासधिकारी उपनिरिक्षक रणजीत गुंडरे यांनी घटनास्थंळ संशयिताच्या संपर्कातील काही व्यक्तींकडे चौकशी करत, गेल्या पंधरा दिवसापासून फरारी सशयिंत आरोपीच्या मुसक्या आवळत कराड येथून ताब्यात घेतले.त्यांच्या पथकातील संदीप साळुंखे,संदीप नलावडे, हवालदार दौलत कोळी यांनी कारवाईत भाग घेतला.
पुढील तपास उपनिरीक्षक गुंडरे करत आहेत.