जत | गंभीर दुखापत केल्याप्रकरणी 4 आरोपींना 1वर्ष सक्तमजूरी | कोळीगिरी येथील प्रकरण |
12 हाजार दंड व 10 हाजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश
जत,प्रतिनिधी : कोळीगीरी ता.जत येथे जमिनीच्या कारणावरून झालेल्या मारहाण प्रकरणी चार आरोपींना दोषी ठरवत जत न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी,12 हजार रूपये दंड व दहा हजार रूपये नुकसान भरपाईची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी कोळीगीरी गावाच्या हद्दीत खरेदी घेतलेल्या भैरप्पा सिद्धराया गौरगोंडा यांच्या जमिनीत 4 जुलै 2010 रोजी सकाळी 11च्या सुमारास गुन्हा घडला होता. सुवर्णा भैरप्पा गौरीगोंड,वय- 26,शिवाप्पा सिद्धराया गौरगोंड, वय-45, गौरव्वा शिवाप्पा गौरगोंड,वय- 30,भैरप्पा
सिद्धराया गौरगोंड वय- 51(सर्वजण रा. कोळीगीरी) यांनी संगनमत करून फिर्यादी भौरव्वा शंकर चमकेरी (वय 50, रा.कोळीगीरी) यांना तु आमच्या रानात शैळ्या का सोडल्यास व जमिनीचा सातबारा जमिनीच्या सातबारा नोंदीच्या कारणावरून भांडण-तंटा करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. यातील आरोपी सुवर्णा गौरगोंड यांनी फिर्यादीच्या उजव्या हाताचे बोटाच्या चावा घेऊन आप खुशीने दुखापत करून जखमी केले आहे.म्हणून सर्व आरोपी विरुद्ध भा.द.वि. 324,323,504,34 अन्वये जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास हवलदार जे.बी.मोरे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील संतोषकुमार फरताळे यांनी सहा साक्षीदार तपासले, त्यामध्ये फिर्यादी,नेत्र साक्षीदार,वैद्यकीय अधिकारी,तपासाधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.आर.पाटील यांनी आरोपींना भा.द.वि. 325 प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी 1000 दंड,दंड न भरल्यास एक महिना साधा करावास,भा.द.वि. 323 अन्वये सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार दंड,दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना साधा करावास भा.द.वि.कलम 504 प्रमाणे सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार दंड,दंड न भरल्यास एक महिना साधा करावा अशी
शिक्षा ठोठावली.त्याचबरोबर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 357 प्रमाणे फिर्यादीस अरोपीनी दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने केले.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील संतोषकुमार पातळे यांनी कामकाज पाहिले पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पाटील यांनी मदत केली.