सांगली : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सतर्क पोलीसांनी सोमवारी शस्ञसाठा पकडला.सांगली नजिक सराईत गुन्हेगारांना पकडत एक देशी बनावटीचे पिस्टल,एक गावठी कट्टा, 6 जिवंत काडतुसे,आरोपींनी वापरलेली दुचाकी जप्त करत सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगस्त केला.सराईत गुन्हेगार सचिन महादेव जाधव(रा.खडखडवाडी,सातारा),रोहित केशवराव यादव-देशमुख(रा.मुळ गाव गुणा,मध्यप्रदेश)यांना अटक केली.
गुंडा स्कॉड पथकाचे संतोष डोके यांच्या पथकांनी ही कारवाई केली.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंद्याचे उच्छाटन करण्यासाठी पोलीसाच्या सतत कारवाया सुरू आहेत.त्याअनुषंगाने सोमवारी गुन्हा पथक छापामारी करत असताना पोलीस रेकार्डवरील सराईत गुन्हेगार सचिन जाधव,व रोहित यादव-देशमुख संशयास्पद फिरताना दिसले.त्यांच्याकडे चौकशी केली असता देशी बनावटीचे पिस्तूल गावठी कट्टा असा तब्बल सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त आढळूंन आला.त्यांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. याबाबत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व शशिकांत बोराटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.पथकाचे प्रमुख डोके,शरद माळी, परमेश्वर नरळे, महेश आवळे, अरूण औताडे,मेघराज रूपनूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सांगली : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकांने जप्त केलेला शस्ञसाठ्यासह जिल्हापोलीस प्रमुख सुहैल शर्मा,शशिकांत बोराडेसह पथक