उमदी(महेश हडपद) : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या उमदी येथील श्री.मलकारसिध्द देवाची यात्रा शनिवार दि.10 एप्रिल पासून शनीवार दि.14 एप्रिल पर्यत भरत असून या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांची सोयी सुविधा उपलब्ध केल्याची माहिती यात्रा कमिटीचे चेअरमन शिवानंद कुळोळी व व्हा.चेअरमन भिमशा कोरे यांनी दिली.
कुळोळी,कोरे म्हणाले की,यात्रेसाठी उमदी ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रा परिसरात गेली आठ ते दहा दिवस स्वच्छता राबवण्यात आली,असून पिण्याच्या पाण्यासाठी जागो-जागी हौद बांधून त्यात टँकरने पाणी टाकण्यात येणार आहे.बुधवार दि.10 एप्रिल रोजी यात्रेचा पहिला दिवस आहे.यादिवशी उमदी येथील श्री.मलकारसिध्द व कोंतेवबोबलाद येथील श्री.कुंती देवी यांची सांयकाळी यात्रा परिसरात भेटी कार्यक्रम होणार आहे.गुरूवार दि.11 रोजी जंगी कुस्त्या व धार्मिक कार्यक्रम व शुक्रवार दि 12 रोजी करमणुकीचे कार्यक्रम शनीवार दि.13 रोजी जनावराचे प्रदर्शन व बक्षिस वितरण रवीवार दि.14 रोजी
पहाटे देव खेळविणे तसेच यात्रा समारोप असे कार्यक्रम होणार आहे.यासाठी जिल्हाअधिकारी यांच्याकडून परवानगी घेतली आहे. ग्रामपंचायत वतीने जय्यत तयारी केल्याचे सरपंच वर्षा शिंदे यांनी सांगितले .
सिमावर्ती उमदी येथील मलकारसिध्द यात्रा हे खिलार खरेदी-विक्री जनावंरासाठी प्रसिध्द आहे.अनेक नामवंत खिलार जनावरे या यात्रेसाठी येतात यावर्षीही दुष्काळ असूनही मोठी उलाढाल होणार आहे.
उमदी (ता.जत) येथील श्री. मलकारसिध्द देवाची यात्रा दि 10 ते 14 एप्रिल अखेर भरत आहे. या यात्रेसाठी उमदी पोलीस ठाण्याच्या वतीने खास बंदोबस्त ठेवण्यात येणार असून ही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी उपाययोजना पुर्ण झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी दिली.
यात्रसाठी दररोज जवळपास 15 टँकर मोफत पाणी पुरवठा
श्री.मलकारसिध्द यात्रेनिमित्त येथील नेते सुरेश कुळोळी यांनी स्व:खर्चातून 20 किलोमीटरवरील मंगळवेढा तालुक्यातून दररोज 15 टँकर ने यात्रेसाठी यात्रास्थंळ व ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरू आहे. तीव्र पाणी टंचाईच्या काळात कुळोळी यांच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
उमदी: उमदी ता. जत येथील श्री.मलकारसिध्द देवाची यात्रेनिमित्त मंदिराची रंगरगोटी करण्यात आली आहे.