जत, प्रतिनिधी:श्री संत सद्गुरू बागडेबाबा तपोवन रेवनसिद्ध चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.प.प.तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि 21 व 22 मार्च रोजी जगद्गुरू तुकाराम महाराज बीज व वैकुंठ गमन सोहळा तसेच दोन दिवसीय हरिनाम गजर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.21 मार्च रोजी सकाळी वीणा पूजन शिवराया हत्तळे व कै. रामचंद्र माने सरकार यांच्या पत्नीच्या हस्ते करण्यात येणार आहे
त्यानंतर दोन दिवस अध्यात्मिक व समाजप्रबोधन पर विविध भागांतील कीर्तनकार महाराज यांचे सुश्राव्य असे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.22 मार्च रोजी हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांचे किर्तन होणार आहे.तसेच काल्याचे किर्तन व पुष्पार्पण आणि महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होत आहे.महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखला जातो.याठिकाणी थोर संत महात्मे घडून गेले त्यांनी आध्यत्मिक व वारकरी संप्रदायाची पताका कित्येक वर्षे शतके आज ही अविरतपणे उभी आहे.मराठी वारकरी संत तुकाराम(तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला.पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्गुरु ‘ म्हणून ओळखतात अशा या थोर संतांची बीज व वैकुंठ गमन सोहळा श्री.संत सद्गुरू बागडेबाबा महाराज तपोवन रेवनसिद्ध चिखलगी भुयार येथे संपन्न होत असून या सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी उपस्थित राहून यास सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.