जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वळसंग येथील अरविंद पंढरी कोडग हा आरोपी 14 वर्षापासून न्यायालयाचे अटक वॉरण्ट असतानाही पोलीसांना चकवा देता गायब होता.त्याला गुरूवारी ता.14. रोजी जत पोलीसांनी ताब्यात घेतले.अरविंद कोडग हा आर.सी.सी.नंबर 89/05 या गुन्ह्यातील आरोपी होता.सन 2015 ला त्याला अटक करण्यात आली होती.त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला.तेव्हापासून तो न्यायालयात एकाही तारखेला हजर न राहिल्याने त्यांच्या विरूद्ध अटक वॉरण्ट काढले होते.मात्र गेली चौदा वर्षे तो पोलीसांना गुंगारा देत होता.गुरूवारी ता.14 ला वळसंग येथील मयत नातेवाईकांच्या कुंटुबियांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना लागली होती.त्यानुसार सापळा लावत त्याला अटक करण्यात आली.पोलीस निरिक्षक शिवाजी गायकवाड,यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक विनायक शिंदे,प्रंशात गुरव,विनोद हसबे यांनी कारवाई केली.