जत | शिवराज यादव हत्या प्रकरण : आजी-माजी सैनिकाचे निवेदन |
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वायफळ येथील सैन्यदलातील जवानाचा मुलगा असणाऱ्या शिवराजचा निघृणपणे खून करून मृत्तदेह विहिरीत टाकणाऱ्या अरोपींना मुत्यूदंडाची शिक्षा करावी अशी मागणी आजी-माजी सैनिकांच्या संघटनेच्या वतीने जिल्हापोलीस प्रमुख,सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सैन्यदलात काम करणारे जवान कुंटूबियांना घरी सोडून देशाची सेवा करतात.त्यांच्या कुंटूबियांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे.नुकत्याच वायफळ येथील जवान दिगंबर यादव यांच्या अडीच वर्षीय मुलांची निघृण हत्या करण्यात आली.हत्यारे शिक्षक दांपत्य पोलीसाच्या कस्टडीत आहेत.त्यांच्यावर कडक कारवाई करून फांशीची शिक्षा द्यावी,जेणे करून भविष्यात असा प्रकार होणार नाही.