आवंढी,वार्ताहर : शेगाव (ता.जत) येथे लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ व पोलीस यांची बैठक संपन्न झाली.यावेळी बोलताना पोलीस निरिक्षक श्री.गायकवाड म्हणाले, लोकसभा निवडणूक काळात सर्वांनी आदर्श आचारसहितेचे पालन करावे.कोणत्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करू नये.त्याशिवाय येत्या काळात होणाऱ्या यात्रा,जत्रा व उत्सव शांततेत पार पाडा असे आवाहन गायकवाड यांनी केले.यावेळी पोलीस कॉन्स्टेबल श्री. हाके व सचिन जवंजाळ व शेगाव,बनाळी,आवंढी,लोहगाव, वाळेखिंडी,सिंगनहळ्ळी परिसरातील लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडणूक काळात आदर्श आचारसहितेचे पालन करा : रणजीत गुंडरे
जत,प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक काळात आदर्श आचारसहितेचे काटेकोर पालन करा,कोणत्याही प्रकारे परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था बिघडता कामा नये अशी माहिती पोलीस उपनिरिक्षक रणजित गुडंरे यांनी दिली.लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डफळापूर येथे लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ व पोलीसदलाची बैठक संपन्न झाली.गुंडरे म्हणाले, निवडणूक… मग ती ग्रामपंचायतीची असो किंवा लोकसभेची; टीका, आरोप-प्रत्यारोप तर होतातच! पण, प्रचारादरम्यान एकमेकांची उणीदुणी काढताना काही पथ्यं प्रत्येक उमेदवाराने आणि नेत्याने पाळणं बंधनकारक असतं. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत कसं वागायचं, कसं बोलायचं, याचे जे नियम निवडणूक आयोगाने तयार केले आहेत, तीच आचारसंहिता. म्हणजेच,निवडणुका मुक्त आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, या हेतूने ही मार्गदर्शक तत्त्वं ठरवण्यात आली आहेत.त्याचे सर्वांनी पालन करावे.यावेळी सा.पोलीस निरिक्षक सचिन गढवे,हवलदार श्री.पवार,सचिन जंजजवाळ,श्री.शिंदे व गावातील लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ उपस्थित होते