जत | शिवराज यादवची हत्याच,महत्वाचे धागेदोरे पोलीसाच्या हाती |

0

 आज अरोपीच्या अटकेची शक्यता,वज्रवाड जैसे थे

जत,प्रतिनिधी : जत तालुक्याला हदरवणाऱ्या वायफळ व वज्रवाड अपहरण प्रकरणाचा पोलीसाकडून कसून तपास सुरू आहे.वायफळच्या अडीच वर्षीय युवराज यादव या चिमुकल्याच्या हत्या प्रकरणातील तपास अंतिम टप्यात असून पोलीसाच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत.शिवराजची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.कोणत्याही क्षणी आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.दरम्यान वज्रवाड प्रकरणाचे गुढ कायम असून मयत अक्षराच्या मृत्यूचा अद्याप उलघडा झालेला नाही.पोलीसाकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. 

Rate Card

वायफळ पासून काही अंतरावर राहणाऱ्या यादव वस्तीवरील अडीच वर्षीय युवराज यादवची कौंटुबिक इरशेतून हत्या झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.सैन्यदलात नोकरी बजावत असणाऱ्या दिगंबर यादव यांचा युवराज मुलगा आहे.सतत हसतमुख व खेळकर स्वभावाच्या शिवराजचे शुक्रवार ता.8 ला अपहरण झाले होते. तर रवीवार ता.10 ला घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील विहिरीत शिवराजचा मृत्तदेह आढळला होता.दरम्यान शिवराजचे चुलत चुलते-चुलतीने शिवराजच्या हत्या केल्याच्या संशयावरून त्यांच्यावर संप्तत नातेवाईकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र पोलीसांनी हस्तक्षेप करत त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या भोवतीच दोन दिवसापासून पोलीसांचा तपास सुरू आहे.जवळपास महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहे.अन्य काही बाबीचा उलघडा होणे बाकी असल्याने पोलीसाकडून अधिकृत्त माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.आज कदाचीत पोलीसाकडून पत्रकार परिषदेत घटनाक्रम सांगितला जाण्याची शक्यता आहे. याबाबत डीवायएस दिलीप जगदाळे यांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान वज्रवाड अक्षरा मठपती हत्या प्रकरणाचा पोलीसाकडून कसून तपास सुरू आहे.मृत्तदेहाचे महत्वाचे रिपोर्ट हाती येणें बाकी आहे.अन्य अत्याधुनिक यंत्रणा वापरत पोलीस तपास करत आहेत.आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत.लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळू असे कपास अधिकारी रणजीत गुंडरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.