बेंडग टप्पा क्र.3 मधून थेट पाईपाईलानने पाणी येणार ; योजनेचे अंकलगीत सादरीकरण
संख,वार्ताहर : जत तालुक्यातील सिंचनापासून वंचित 65 गावांना म्हैसाळ योजनेचे कायमस्वरूपी पाणी देणार आहोत.म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प बेडग येथील टप्पा क्र.3 मधून 438 किलोमीटर थेट पाईपलाईनने पाणी आणण्याची ही विस्तारित योजना प्रस्तावित आहे.या योजनेचा वस्तूनिष्ठ प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे.पुर्व भागाला संजीवनी ठरणाऱ्या या योजनेस मान्यता मिळवून हा भाग पाणीमय करू,अशी ग्वाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजयकाका पाटील व आमदार विलासराव जगताप यांनी दिली.
अंकलगी (ता.जत) येथे तालुक्यातील सिंचनापासून वंचित 65 गावाना प्रस्तावित म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
जत पुर्व भागातील सिंचनापासून वंचित गावासाठी महत्वपूर्ण योजना आखण्यात आली आहे.थेट बेडग टप्पा क्र.3 मधून पाईपलाईन,सिमेंट कँनॉलच्या माध्यमातून येथेपर्यत पाणी पोहचविण्यात येणार आहे. या योजनेचा स्लाईड प्रोजेक्टरद्वारे म्हैसाळचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना दिली.या बैठकीला बालगाव मठाचे अमृतानंद स्वामीजी,गोधळेवाडी मठाचे हभप तुकाराम महाराज,माजी सभापती प्रकाश जमदाडे,सुरेश शिंदे,मन्सूर खतीब,पंचायत समिती सभापती सौ.सुशिला तांवशी,जि.प. सदस्य सरदार पाटील,शिवाजी ताड,उमेश सावंत,सुनिल पवार,सरपंच सविता तेली,विजयकुमार चिप्पलकट्टी,कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्यासह 65 गावांतील सर्वपक्षीय
लोकप्रतिनिधी,शेतकरी उपस्थित होते.
खा.पाटील म्हणाले,जत तालुक्यातील या 65 गावांना सतत अवर्षणाचा फटका बसतो,प्रत्येक वर्षी पाणी टंचाई दुष्काळ यामुळे येथील शेतकरी हालाखीचे जीवन जगत आहेत.त्यांना सिंचन योजनेतून पाणी देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.कर्नाटकातील योजनेतून पाणी देता येते का यांचाही अभ्यास करण्यात आला. मात्र ती योजना अडचणीचे ठरण्याची शक्यता होती.म्हणून म्हैसाळ सिंचन योजनेतून या भागाला पाणी देण्यासाठीच्या विस्तारित योजना विचारधीन होती.त्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. या भागातील 65 गावे ओलिताखाली येतील अशी म्हैसाळ योजनेतून
सहा महिने आमच्या अधिकाऱ्यांनी काम करून सुधारित म्हैसाळ जत
विस्तारित योजना आखण्यात आली आहे.त्यांचा प्रस्ताव आज आम्ही मुख्यमंञ्यासाठी सादर करून तत्वत:मंजूरी घेणार आहोत.त्यांच्या निधीसाठी नाबार्ड,केंद्रशासन यांच्या कडे प्रयत्न केला जाणार आहे. निधी मिळताच 18 महिन्यात योजना पुर्ण करून या भागाला पाणी देणार असल्याचेही शेवटी खा.पाटील यांनी सांगितले.
आ.विलासराव जगताप म्हणाले,म्हैसाळ विस्तारीत जत उपसा योजना ही तांत्रिकदृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या सोईची होणार आहे.यामुळे 60 हजार एकर लाभक्षेत्रात ओलिताखाली येणार आहे. योजनेसाठी 650 कोटीचा निधी प्रस्तावित आहे.हे पाणी बंदिस्त पाईपलाईन व क्राॅकिटकरण केलेल्या कँनॉलद्वारे येथे येणाप आहे.कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी मिळण्याची आशा धूसर झाली आहे.कर्नाटक सरकारची भूमिका खरीप हंगामातच पाणी देण्याची असल्याने ही स्वतंत्र विस्तारात योजना आखण्यात आली आहे.थेट पाईपलाईन असल्याने वितरण व्यवस्था देखील सोईचे ठरणार असून कामे गतीने करणे शक्य आहे. विस्तारीत योजनेद्वारे वंचित 47 गावे व अशत: वंचित 17 गावाकरिता ही पाणी योजना राबविण्यात येणार आहे.त्यामुळे भविष्यात
या भागातील दुष्काळ संपणार आहे.
अंकलगी ता.जत येथील वंचित गावांना पाणी देण्याच़्या योजनेसंदर्भात मार्गदर्शन करताना खासदार संजय पाटील व्यासपीठावर आ.विलासराव जगताप व मान्यवर