बिळूर :बिळूर ता.जत येथील श्री.काळभैरवनाथ देवस्थानचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला आहे.यामुळे जत तालुक्यातील या ऐतिहासिक मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे.या योजनेतून त्यापुढे थेट राज्यशासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे.नवसाला पावणाऱ्या काळभैरनाथ देवाचे मोठ्या संख्येने भाविक असणाऱ्या भव्य असे मंदिर बिळूर येथे आहे. भाविकांच्या देणगी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.अन्य कामेही करण्यात येत आहे.मात्र निधीची कमतरता भासत होती.त्यामुळे तीर्थक्षेत्र विकास योजनेत या मंदिराचा समावेश व्हावी अशी मागणी होती.मंदिरासाठी मंदिरालगत पाच एकर जागा खरेदी करण्यात आली आहे.तेथे भक्त निवास,सुसज्ज स्वच्छतागृह,गार्डन,धार्मिक सभागृह असे विविध उपक्रम राबवून मंदिर परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.त्याशिवाय मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासह अन्य कामे करण्यात येणार आहेत. तिर्थक्षेत्र विकास योजनेत समावेशासाठी बिळूर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नागनगौडा पाटील आणि विशेष प्रयत्न केले होते.