जत,प्रतिनिधी : जत पुर्व भागातील गावांना म्हैसाळ सह अन्य सिंचन योजनेतून पाणी आणण्यासाठीचा लढा आता निर्णायक टप्यावर पोहचला आहे.नागरिकांच्या मोठ्या पांठिब्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरणार असून उद्याच्या या मेळ्याव्यात सिंचन योजनेसाठीच्या लढ्याची रणनिती ठरवण्यासाठी भव्य शेतकरी मेळावा व शेतकरी संवाद बैठकीचे आयोजन माडग्याळ येथील बाजारकट्टा येथे केली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून सीमावर्ती जत पश्चिम भागाला 70 वर्षात राजकर्त्यांनी फक्त मतदानासाठी वापर करून घेतला.येथे प्राथमिक सुविधा पासून पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा यातना सोसण्याची वेळ या शासनाने आणली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सतत दुष्काळ पडत असून,प्रत्येक वर्षी उपाययोजना होऊन कोट्यावधीचा चुराडा होता आहे.तरीही या भागात पाण्याचा वनवा कायम आहे.कितीही उपायोजना झाल्या तरी टँकर पाठ सोडत नाही.शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.दिवस-रात्र कष्ट करूनही पाण्याअभावी या भागातील उभी पिके दरवर्षी हातातून जात आहेत.प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी, शासन याकडे गंभीर लक्ष देत नसल्याने प्रश्न प्रश्नच राहिले आहेत. येथील सामान्य नागरिकांच्या संयमाचा गैरफायदा घेत यांना कायम दुर्लक्षित ठेवले आहे.आता या संयमाचा बांध फुटला असून पूर्व भागातील 42 गावातील लोकप्रतिनिधी,शेतकरी,ग्रामस्थ आक्रमक झालेत.गोंधळवाडी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली 42 गावातील दुष्काळी नागरिकांनी सरकारला हलवेल असा लढा उभारला आहे.या शेतकरी मेळाव्यात जत पूर्व भागात सिंचन योजनेतून पाणी आणणार असा एक मुखी ठराव घेण्यात येणार आहे.त्यानंतर प्रचंड आक्रमक आंदोलनाचे सुरुवात करून शासनाला परिस्थितीचे वास्तव दाखवण्याचे काम करणे केले जाणार आहे.त्यामुळे या मेळाव्याला प्रचंड संख्येने उपस्थित राहून आपल्या न्याय हक्कासाठी पाठिंबा द्यावा असे आवाहन तुकाराम महाराज यांनी केले.दरम्यान पाचव्या दिवशी तुकाराम महाराज यांच्या टिमने पाडोंझरी,मोटेवाडी,कागनरी,तुर्क आंसगी,तिकोंडी,तांबेवाडी,पांढरेवाडी,लमाणतांडा,दरिबडची,खंडनाळ,संख,गोंधळेवाडी, आंसगी जत,राजोबाचीवाडी येथे दौरा केला.या सर्व गावातील संरपच,उपसंरपच, ग्रामस्थांनी या अंदोलनाला पांठिबा दिला.माडग्याळ येथील मेळाव्यातून शासनाला जाग आणू असे अभिवचन दिले.