गुड्डापूर | येथे तीव्र पाणी टंचाई |

0

गुड्डापूर,वार्ताहर : गुड्डापूर ता.जत येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचे पाणी स्रोत कमी झाल्याने नागरिकांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे. परिणामी पाणी मिळविण्यासाठी भंटकती करावी लागत आहे.ग्रामपंचायत जवळच्या पाणी टाकीजवळ पाणी मिळविण्यासाठी घागरीची भली मोठी रांग लागत आहे.यातील अनेक ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याची ओरड होत आहे. दुसरीकडे गुड्डापूर येथे प्रसिध्द श्री.दानम्मादेवी देवस्थान असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी असते.त्यांनाही या पाणी टंचाईची झळ बसत आहे.ग्रामपंचायतीने जानेवारीत टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दिला आहे. मात्र फेंब्रुवारी संपत आला तरीही उद्याप टँकर न मिळाल्याने ग्रामस्थाचे हाल सुरू आहे. प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करावा अशी मागणी होत आहे.

गुड्डापूर ता.जत येथे पाणी टंचाई मुळे भली मोठी घागरीची रांग लागत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.