डफळापूर, वार्ताहर : जत तालुक्यातील पश्चिम भागातील डफळापूर -अंकले,व डफळापूर- डोंगरगाव दोन महत्वपूर्ण रस्त्याचे उद्घाटन खासदार संजय काका पाटील,आमदार विलास जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी माजी सभापती प्रकाश जमदाडे,जि.प.सदस्य महादेव पाटील, बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण,अँड. प्रभाकर जाधव,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,अप्पा मासाळ, नगरसेवक उमेश सावंत,भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद अष्टेकर,भाजपचे कार्याध्यक्ष सुनिल पवार,बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजयकुमार ठोंबरे, अभिंयता दत्तात्रय काटकर, उपसरपंच प्रताप चव्हाण,युवक नेते सज्जन चव्हाण,परशुराम चव्हाण सर,संजीव सावंत,आप्पासाहेब तेली, राहुल पाटील,उत्तम संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.या दोन्ही रस्त्यामुळे डफळापूर दोन राष्ट्रीय महामार्ग व दोन जिल्ह्याला जोडले जाणार आहे. डफळापूर-अंकले रस्त्यामुळे कवटेमहांळ-जत व विजापूर-गुहागर हा मार्ग जोडला जाणार आहे.तर डफळापूर-डोंगरगाव या जिल्हामार्गामुळे कवटेमहांळ-जत व कवटेमहांकाळ नागज ते जत, बरोबर सोलापूर जिल्हा जोडला जाणार आहे.डफळापूर, बाज,धावडवाडी,प्रतापपूर,गुळवंची