जत | हिंदू स्मशान भूमीलगतच्या स्वच्छ जागेत पुन्हा कचऱ्याचे ढिगारे |

0

जत,प्रतिनिधी :जत शहरात मोठ मोठ्या भिंती रंगवून स्वच्छेचा गाजावाजा करणाऱ्या पालिकेच्या हिंदू स्मशान भूमी जवळच कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात येत आहे.स्मशानभूमीची स्वच्छ केलेली जागा परत कचरा टाकण्यासाठी वापरण्यात येत आहे.त्यामुळे पुन्हा तेथून ये-जा करणाऱ्या नागरिक व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दररोज परिसरात घाणीचे साम्राज्य वाढत आहे.स्वच्छता ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर नागरिकातून उमटत आहे.याबाबत वारवांर कल्पना देऊनही अधिकारी,कर्मचारी, नगरसेवकांकडून डोळेझाक होत आहे.टाकलेल्या कचऱ्यांत काही मुली प्लास्टिक साहित्य,तर जनावरे चारा धुडाळतांने किळसवाणी छायाचित्र जतची प्रतिमावर डाग पाडत आहे.आता सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी लक्ष घालून समस्या सोडवावी अशी तिखट प्रक्रिया नागरिकातून उमटत आहे.

जत,शहरातील स्मशानभूमीच्या स्वच्छ केलेल्या जागेत नव्याने असा कचरा टाकून अस्वच्छता केली जात आहे.

Rate Card

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.