जत,प्रतिनिधी : जत पुर्व भागातील सिंचन योजनेच्या पाण्यासाठीच्या माडग्याळ येथील पाणी परिषदेसाठी गावनिहान बैठकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. गोंधळेवाडी मठाधिपती तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली माडग्याळ येथील बाजार कट्टा येथून बैठकांची सुरूवात करण्यात आली. गुड्डापूर,सोरडी,कुलाळवाडी,तिल्
माडग्याळचे संरपच इराण्णा जत्ती,अंबाण्णा माळी,शंशिकात माळी,महादेव माळी,जेटलिंग कोरे,गुरू माळी,व्हनाप्पा माळी,पांडूरंग माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
गुड्डापूर ग्रामस्थांच्या वतीने या ऐतिहासिक संघर्ष यात्रेस ग्रामस्थांनी तुकाराम महाराजाच्या पाठिशी ठामपणे उभा राहणार असल्याचे स्पष्ट केले.श्री.दानम्मादेवी ट्रस्टच्या वतीने या मेळाव्यास सर्वोत्तरी मदतीचे आश्वासन ट्रस्टच्या वतीने देण्यात आले.संरपच अशोक पुजारी व पदाधिकारी उपस्थित होते.
सोरडी येथील बैठकीत तुकाराम महाराज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली,संघर्षाशिवाय आपल्याला पाणी मिळणार नाही.त्यामुळे संघटित होण्याची वेळ आल्याचे सांगितले.पाण्यासाठी आम्ही गावबंद करून अंदोलनात सहभागी होण्याचे लोकप्रतिनिधी,ग्रामस्थांनी अभिवचन दिले.कुलाळवाडी,तिल्याळ येथे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या बैठकीत आम्ही आता पाणी घेतल्याशिवाय गप्प बसणार नसल्याची भूमिका मांडत तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जाग आणणारा मेळावा घेऊ असे स्पष्ट केले.दरम्यान पहिल्याच दिवशीच्या आढावा बैठकींना तूफान प्रतिसाद लाभला.यावेळी सरपंच दत्तात्रय चव्हाण,सुरेश कटरे,चंद्रशेखर पुजारी,कल्लाप्पा गुरव,धानाप्पा पुजारी,आप्पू पुजारी,सिताराम पुजारी,बाळासाहेब वाकसे यांच्यासह उपसरपंच ,सर्व शेतकरी सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सिंचनापासून वचिंत गावांनी सहभाग नोंदवावा.जत पुर्व भागासह तालुक्यातील सिंचनापासून वंचित गावात पाणी आणण्यासाठी हा लढा उभारला आहे.त्यामुळे पुर्व भागातील 42 गावाबरोबर अन्य गावात कँनॉल जाऊनही पाणी सोडले नाही.अशा गावांनी या अंदोलनात सहभागी व्हावे.सरकारला जाग आणण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. सिंचनापासून वचिंत भागाना पाणी मिळवून देणे यासाठी आमचा हा निर्णायक लढा सुरु आहे.
– ह.भ.प.तुकाराम महाराज