जत | शिवजंयतीनिमित्त शिवकालीन शस्ञाचे प्रदर्शन |

0

जत,प्रतिनिधी : 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव सोहळा 2019 निमित्त जतेत शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन उत्साहात पार पडला.या प्रदर्शाचे उद्घाटन श्रीमंत शार्दूलराजे डफळे,श्रीमती जोत्सनाराजे डफळे,

प्राचार्य श्री.बोराडे सर यांच्याहस्ते शस्त्राचे पूजनाने झाली.ज्या शस्ञांनी छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्य निर्माण केले,त्यांची माहिती आजच्या पिठीला व्हावी उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले.शहरातील हाजारो ग्रामस्थ व सर्व शाळातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.यावेळी शिवकालीन शस्त्राच्या शास्त्रात पारंगत असलेले नितीन जोशी यांनी या शस्ञाचा युध्दात कसा वापर केला गेला याविषयी मार्गदर्शन केेेले.

शिवजयंती निमित्त एक चांगला उपक्रम राबविला.शिवयोध्दा शंभूराजे मित्र मंडळानी आयोजन केले होते.यापुढेही असेच कार्यक्रम व्हावेत,अशी अपेक्षा श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी व्यक्त केले.

Rate Card

जत,येथे जतेत शिवजंयतीनिमित्त शिवकालीन शस्ञाचे प्रदर्शनाती शस्ञे पाहताना शाळकरी मुले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.