लोकप्रतिनीधीना जाब विचारण्याची ताकत गावगाड्यात विकास करेल
जत,प्रतिनिधी : आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जोपर्यत आपण जाब विचारत नाही,तोपर्यत गावगाड्याचा विकास शक्य नाही.लोकप्रतिनिधी जनतेचा आहे.त्याला कमिशन खाण्यासाठी तेथे पाठविला नाही.आपल्या खिशातून गेलेल्या ट्रैक्सच्या निधीतून विकास कामे होत असतात.त्यामुळे कुठला उपाध्यक्ष पाणी देतोय हा सगळा झूट प्रकार आहे, असा टोला नाव न घेता खा.संजय पाटील यांना धनगर समाज आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी हाणला.
ते डफळापूर ता.जत येथे युवक मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते.यावेळी शिक्षण व सभापती तम्माणगोंडा रविपाटील,लक्ष्मण जकगोंड,दादासो पांढरे,सुनिल बिराजदार,युवराज डोंबाळे,भाऊसो दुधाळ,अँड.नाना गडदे, आदी मान्यवर उपस्थित होते.काश्मीर मधील भ्याड दहशवादी हल्ल्यातील जवानाना यावेळी श्रंध्दाजली वाहण्यात आली.प्रस्ताविक प्रविण पाटील यांनी करून युवकांच्या समस्या मांडल्या.
पडळकर पुढे म्हणाले,तम्माणगोंडा रवीपाटील यांच्यावर गुन्हा दाखल कुणी करायला लावला हे जगजाहीर आहे.नवे नेतृत्व पुढे येऊ नये,म्हणून खोटे गुन्ह दाखल करून त्याचे खच्चीकरण करायचे प्रकार सालोसाल सुरू आहेत.या प्रस्तापित यंत्रणेविरोधात गेल्यास करताना असा आवाज दाबण्याचे प्रकार सत्ताधारी करतात.त्यामुळे
अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी संघटीत होणे गरजेचे आहे.
पडळकर म्हणाले, जत तालुक्यात टक्केवारीचा खेळ चालतो. 20-20 टक्के हाणले तरी यांचे समाधान होत नाही. रोजगार हमीत 50 कोटींचा घोटाळा झाला. शेतकऱ्यांच्या योजनांवर पुढारी गब्बर झाले.
छत्रपती शिवाजी महाराजासारखे विचार घेऊन जीवन जगण्याचे प्रयत्न करण्याची गरज आजच्या युवकांकडे आहे. जत तालुक्यातील युवकाने सिंचन योजनेतून आलेले पाण्याचे योग्य व चांगल्या पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे, त्याशिवाय दुष्काळ संपणार नाही.तो संपवण्यासाठी अनेक संघटना दुष्काळावर काम करतात.त्यांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामात आपण सहभाग घेणे गरजेचे आहे. शासकीय योजनेसाठी येणारा निधी हा आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या खिशातून येतो तो कुणाच्या कुणाच्या खिशातून येत नाही. त्यांनी योजना राबवणे हे त्याचं काम आहे. शासकीय योजना मिळवण्यासाठी युवकांचे संघटन महत्त्वाचा आहे.सरकारवर दबाव टाकून शासकीय योजना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.बँका कर्ज देत नसतील तर त्या अधिकार्याचे टाळूवरचे केस काढण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे अशी ताकद निर्माण करा,तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल.युवकांनी वेेळ वाया न घालवता उद्योग,व्यवसाय करावा कोणत्याही
स्थितीत आई-वडिलांचे कल्याण होईल असे काम करावे,गुन्हेगारी कमी झाली पाहिजे.यामुळे युवक देशोधडीला लागत आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीने अनेक पिठ्यान् पिठ्या बरबाद होत आहे.जनतेच़्या पायात काटा टोचल्यावर ज्या युवकांच्या डोळ्यात पाणी येईल,ज्याला लोकहिताची तळमळ अाहे. अशा युवकांला गावातील नेता करा,दलाली करणाऱ्या अलातू फालतूला यात शिरकाव करू देऊ नका.त्याला लाथा घाला. गावगाड्यातील शेवटच्या माणसापर्यत मदत करण्याची तयारी युवकांमध्ये असली पाहिजे.गावात माणूसकी टिकली पाहिजे यासाठी तरूणांनी गावातच रहाणे गरजेचे आहे. धार्मिक सण,उत्सव कुंटुबांनी एकत्र येऊन साजरे करावेत.युवकांनी बिल गेट्सचा विचारांनी चालल्यास काहीही अशक्य नाही. शेतकऱ्यांच्या अडचणीत साथ द्या, बागायतदाराचे पैसे बुडविणाऱ्यां व्यापाऱ्यांना लाथा घाला. खा.संजय पाटील,आ.विलासराव जगताप,यांनी लोकशाहीच्या नावावर लुटले आहे.त्यांनी सभापती रवीपाटील, गुड्डोडगी यांच्या सारख्या माणसावर गुन्हे दाखल केला.असा अन्याय होणाऱ्यांच्या बाजूला युवकांनी उभे राहिले पाहिजे.
तम्मनगाैडा रविपाटील म्हणाले,मी कोणावर विनाकारण टीका केली नाही.माझ्यावर जी टीका झाली,त्याला फक्त उत्तर दिले.जत तालुक्याच्या पूर्व भागास पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न करणे ही चूक आहे का?असा सवाल उपस्थित केला.कार्यक्रमाचे विशाल पाटोळे,अभिजित माळी,स्वराज्य म्हेत्रे,ओंकार माळी यांनी नियोजन केले.