खा.संजयकाका पाटील यांच्या विरोधात कोन,लोकसभा निवडणूक ; अनिश्‍चितता,अस्वस्थता आणि घालमेल

0

जत,प्रतिनिधी : अनिश्‍चितता, अस्वस्थता आणि घालमेल या शब्दांची प्रचिती खऱ्या अर्थाने अनुभवायची असेल तर सांगली जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय स्थितीचे वर्णन करावे लागेल. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले.. त्यासाठी सज्जतेची तयारी करण्याचे दिवस असताना प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीवरुन कमालीची अनिश्‍चितता तर आहेच, शिवाय विद्यमान खासदारांसह संभाव्य उमेदवार आणि नेत्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे.. निष्ठा अभावानेच राहिलेल्या प्रत्येक पक्षातच मग नेता आणि उमेदवारच निश्‍चित नाही तर काम कुणासाठी करायचे, ही कार्यकर्त्यांची घालमेलही स्वाभाविक म्हणावी लागेल.लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना सांगली जिल्ह्यातील राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. खरेतर हे दिवस सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने कसोटीचे.. एप्रिल-मेमध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या परीक्षेस सामोरे जायचे.. त्यासाठी या परीक्षेचा अभ्यास करायचे.. पण, बुथमेळावे, बैठकांव्यतिरिक्त उमेदवारांनी व्यक्तिगत स्तरावर करावयाच्या संपर्क व प्रयत्नांना अद्याप गती मिळाळेली दिसत नाही. त्याची कारणेही तशीच गुंतागुंतीची. 

Rate Card

सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर युती होणार नाही,यावर फार मतातंरे नाहीत.येथे भाजपा मोठा भाऊ आहे.शिवसेनेची ताकत त्यांना उपद्रव करणारी आहे.येथे युतीवर जागा बदल होण्याची किंवा अन्य काही फार गणिते नसल्याने भाजपचे विद्यमान खा.संजयकाकानी  तयारी सुरू केलीय. कॉग्रेसच्या उमेदवारीबाबत सहा महिन्यांपासून उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे.कधी गोपीचंद पडळकरांचे नाव घेतले जाते.तर कधी कॉग्रेसचे निष्ठावत माजी खा.प्रतिक पाटील किंवा त्यांच्या घराण्यातील जयश्रीताई पाटील,विशाल पाटील यांची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा येथे थेट कॉग्रेसला पांठिबा निश्चित मानला जाते.कारण राष्ट्रवादीकडून खासदार पदासाठी एक ही नाव पुढे येत नाही.दुसरीकडे कॉग्रेसचे दिंगवत नेते पंतगराव कदम यांचे चिरजिंव आ.विश्वजित कदम यांच्या नाव समोर येतयं मात्र त्यांना लोकसभेत “रस’ नाही, म्हणून त्यांची नकारघंटा दिली आहे.भाजपकडून जवळपास विद्यमान खा.संजयकाका पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.कॉग्रेसकडून ऐनवेळी कोणाच्या गळ्यात माळ पडते यावर लढतीची चुरस ठरणार आहे. कोणत्याही पक्षात आता निष्ठा अभावानेच राहिलेल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीसाठी काम कुणाचे करायचे? हा प्रश्‍न पडलाय. गेल्यावेळी सारा देश मोदींच्या पाठीशी उभा राहिला, भाजपचे तर सांगायलाच नको. पण, गेल्या चार वर्षांत भाजपतही अनेक स्थित्यंतरे घडली,देशात मोदी विरोधात वातावरण निर्माण होत आहे.विरोधी कॉग्रेसकडून महाआघाडी करून मोठा लढा उभा केला आहे. त्याला आलेले गेल्या काही निवडणूकीतील यशाने बंळ मिळाले आहे. ही सर्व स्थिती लक्षात घेतली तर अनिश्‍चितता, अस्वस्थता आणि घालमेल यांचा विचित्र त्रिवेणी संगम झालेला दिसतोय.. या संगमात सर्वांचेच भवितव्य टांगणीला लागलेले.. बघूया काय होते ते..!  

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.