तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारणार
जत,प्रतिनिधी:जत तालुक्यातील पूर्व भागातील म्हैसाळ सिंचन योजनेपासून वंचित असणारी गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.या गावांना पाणी मिळावे याकरिता चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी पुढाकार घेत म्हैसाळ सिंचन योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले.यासंदर्भात नुकतीच 42 गावातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती.संख येथील पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर तुकाराम यांच्या नेतृत्वाखाली म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांंची भेट घेवून सविस्तर चर्चा केली.माडग्याळ सह संख तिकोंडी, मोटेवाडी सिद्धनाथ,दरिबडची,तिल्याळ,गुड्
जत पूर्व भागातील 42 गावचा पाणी प्रश्न सोडविण्याकरिता पांटबधारेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना चिकलगी भुयारचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज व अन्य पदाधिकारी