जत | पुर्व भागातील वंचित म्हैसाळ सिंचन योजनेत समावेश करावा,पांटबंधारेच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन |

0

 

तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारणार

 

Rate Card

जत,प्रतिनिधी:जत तालुक्यातील पूर्व भागातील म्हैसाळ सिंचन योजनेपासून वंचित असणारी गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.या गावांना पाणी मिळावे याकरिता चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी पुढाकार घेत म्हैसाळ सिंचन योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले.यासंदर्भात नुकतीच 42 गावातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती.संख येथील पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर तुकाराम यांच्या नेतृत्वाखाली म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांंची भेट घेवून सविस्तर चर्चा केली.माडग्याळ सह संख तिकोंडी, मोटेवाडी सिद्धनाथ,दरिबडची,तिल्याळ,गुड्डापुर या गावातील सिंचन योजनेतून पाणी देण्याचे नियोजन सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले.

     

जत पूर्व भागातील 42 गावचा पाणी प्रश्न सोडविण्याकरिता पांटबधारेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना चिकलगी भुयारचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज व अन्य पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.