वळसंग,वार्ताहर : जत तालुका कायम दुष्काळी आणि त्यात प्रशासनाने वळसंग समवेत तालुक्यातील अनेक गावांना दुष्काळ यादीतून वगळले आहे. त्यात वळसंगच्या पदरी ही निराशाच. दुष्काळी चारा छावण्या आणि टँकर सुरू व्हायला जरी तूर्तास उन्हाळा सुरू होत असला,तरीही यावेळी भूजल पातळी लवकर खालावली आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाई प्रश्न उद्भवत आहे.विविध वाड्या वस्त्यांनी संपन्न असलेला वळसंगला गतवर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीच्या आठवड्यातच पाण्यासाठी वणवण सोसाव लागत आहे. प्रशासनाकडे टँकर मागणी केली असली तरीही अद्याप टँकर मिळालेलं नाही. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागते का अशी प्राथमिक भीती वजा संताप जनतेतून उफाळून येत आहे.प्रशासनाने लक्ष घालत वळसंगला टँकर सुरू करावा अशी मागणी आहे.