माडग्याळमध्ये सशस्ञ दरोडा,दरोडेखोंरांच्या पावनेतीन लाखाच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या : दोघांना अटक : गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

0

माडग्याळ,वार्ताहर ; माडग्याळ ता.जत येथील युवराज बियरबार व परमीट रुममधील सशस्ञ दरोडा प्रकरणी उमदी पोलीस,गुंडा विरोधी पथक,व स्थानिंक गुन्हे विभागाच्या पथकाने काही तासात दोन दरोडेखोरांना पकडून दरोड्यातील मुद्देमाल व क्रुझर गाडी(एमएच-10,एएल-2936) सह रंगेहाथ पकडले. पाठलाग करणाऱ्या पथकावर बॉटल फेकत काही दरोडेखोर लंपास झाले.याप्रकरणी दिंगबर रामू चव्हाण (वय-40),दत्तात्रय रामू चव्हाण (वय-26, दोघे रा.पारधीतांडा,जत) अशी या दरोडेखोरांना अटक केली आहे. पोलीसांनी धाडसाने या दोघांना पकडले.सोमवार मध्यरात्री माडग्याळ येथील युवराज बियरबार व परमीट रुममध्ये पहाटे पावणेतीन वाजता शटरचा दरवाज्या कटावणीने उचकटून आत प्रवेश केला.दरम्यान शँटरच्या आवाजाने आत झोपलेल्या मालक बापू नानासाहेब सांवत व कामगार संपत बोरकडे उठले असता काही दरोडेखोरांनी तलवार व लोंखडी रॉडचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.एकाने मारहाण करत एका कोपऱ्यांत बसविले.त्यांचे मोबाईल काढून घेत बियरबार मधील देशी-विदेशी कंपनीचे 2 लाख 22,320 रुपयाच्या दारूच्या बॉटल,काऊंटरमधील 18 हजार,असा दोन लाख 320 रूपयाचा मुद्देमाल घेत दरोडेखोरांनी धुम ठोकली.त्यादरम्यान स्थानिंक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत माडग्याळ नजिक आले होते.त्यांनी दरोडेखोंरांवर पाळत ठेवली होती. दरोड्यां टाकून पळून जाणाऱ्या दरोडेखोराचा माडग्याळ – जत रोडवर पथकांने पाठलाग केला.सुसाट वेगाने चाललेल्या दरोडेखोरांच्या गाडी कोळीगिरीनजिक अपघात झाला,त्यात गाडी पलटी झाली.दरोडेखोरांनी गाडीतून उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी पाठीमागून पाठलाग करणाऱ्या पथकाने त्यांना गाठले.गाडीतील दरोडेखोरांनी पथकावर बॉटल फेक केली.मात्र पथकातील अधिकाऱ्यांनी धाडसाने गाडीजवळ जात दोन दरोडेखोरांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडले.दरम्यान अंधाराचा फायदा घेत अन्य पाच-सहा दरोडेखोरे पळून जाण्यात यशस्वी झाले.घटनास्थंळी उपविभागीय अधिकारी,स्थानिंक गुन्हे शाखेचे पथक, उमदी पोलीस, ठसेतज्ञ,यांनी भेट देत तपास सुरू केला आहे. जतसह सांगली जिल्ह्यात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे.त्या पाश्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुखांनी गस्त वाढवल्या आहेत.माडग्याळ मधील दरोड्यांराच़्या पाळतीवर गस्त पथक होते. पथकांने कतृव्यदक्षता दाखवत दरोडेखोंराचा पाठलाग करून मुद्देमालासह दोन दरोडेखोरांना पकडण्याची कामगिरी केली आहे. या दरोडेखोरांमुळे शेगाव,कुकटोळीसह जिल्ह्यातील अन्य गुन्हे उघडीस येण्याची शक्यता आहे. उमदी पोलीसानी दरोखोरांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी सुनावली आहे. अटक दरोडेखोंरासह त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.दरोडेखोंरानी अन्य कुठे दरोडे टाकले आहेत का?यांचाही आम्ही तपास करत आहोत असे तपासअधिकारी भगवान शिंदे यांनी सांगितले.

Rate Card

दरोडा पडलेले  माडग्याळ येथील युवराज बियरबार अँण्ड परमिट रूम

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.