बळ एकीचे…नाते माणुसकीचे…! येळवीच्या ओंकारस्वरूपा फौंडेशनच्या, प्रेरणादायी उपक्रमाचा केंद्र शासनाच्या पुरस्काराने सन्मान

0
10

जत,प्रतिनिधी : केंद्र शासन अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार जत तालुक्यातील येळवी येथील ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेला जाहीर झाला आहे. नेहरू युवा केंद्राचे समन्वयक प्रमोद हिंगे, लेखापाल संजय कुरणे यांनी ही माहिती दिली.

येळवी येथे ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्था व नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे लेखालिपिक संजय कुरणे येळवीत आले होते.त्याप्रंसगी मंडळाचे काम बघून त्यांनी पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कारासाठी जिल्ह्यातील नामांकित संस्थेने प्रस्ताव दाखल केले होते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सर्व निकष तपासून ओंकारस्वरूपा  फौंडेशन संस्थेला हा मानाचा जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र, व रोख रक्कम रू 25,000/- आहे. लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक पंचाक्षरी अंकलगी, अनिल अंकलगी, प्रकाश गुदळे, येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक अंकलगी,सचिव तथा ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील यांच्या टीमने मागील वर्षभरात नेहरू युवा केंद्र,भारती हॉस्पिटल, लायन्स क्लब, येळवी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने समाजहिताचे विविध कार्यक्रम राबविले आहेत.त्यात दोन आरोग्य शिबिरे घेऊन हाजारो रूग्णांना मदतीचा बात दिला आहे. शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णाची तपासणी करत औषधोपचार करण्यात आले आहेत.रक्तदान शिबिरात पन्नासहून अधिक तरुणांनी रक्तदान केले. या रक्तदानामुळे एका दोन वर्षांच्या मुलीला तातडीने रक्तदान करून तिचा जीव वाचविण्याचे पुण्यकामही मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. येळवी महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विशेष कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा शिबीर, युवा संसद कार्यशाळेतंर्गत स्वछता व योग शिबीर, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यासह आजी,माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा आगळावेगळा कार्यक्रम घेत त्यांना संस्थेने सन्मानित केले. या कार्यक्रमाची दखल सैनिक कल्याण कार्यालयाने घेत संस्थेला प्रशस्तीपत्र दिले. जलयुक्त शिवार व पाणी फौंडेशन, मतदान नोंदणी, रेशनकार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड शिबीराचे आयोजनही केले होते. यासर्व कामाची दखल घेत संस्थेला 

मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.समाजात परिवर्तन आणणाऱ्या ओंकारस्वरूपा फांऊडेशनच्या लोकहिताच्या कामाची दखल केंद्र स्तरावर घेतली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here