येळवी,वार्ताहर : सनमडी(ता.जत) परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढली होती.त्या पाश्वभूमीवर भाजपचे नेते तथा प.स.माजी सदस्य सुनिल पवार यांनी म्हैसाळ कालव्याचे पाणी सनमडी तलावात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.त़्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खा. संजयकाका पाटील, आ. विलासराव जगताप यांच्याकडे मागील दोन दिवसांपासून पाठपुरावा केल्याने वायफळ येथून घोलेश्वर मार्गे सनमडी तलावात म्हैसाळचे पाणी दाखल झाले.त्यांचे पुजन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
सुनिल पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याचे परिसरातील दुष्काळी परिस्थिती हटणार आहे.त्यामुळे पवार यांच्या बद्दल नागरिकांतून कृतज्ञता व्यक्त होत आहे.
प्रथमच घोलेश्वर मार्गे सनमडी तलावात पाणी जाण्यापूर्वी आ.जगताप व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घोलेश्वर ओढा पात्राजवळ जलपूजन करण्यात आले. यावेळी सुनिल पवार, घोलेश्वरचे सरपंच अल्लाबक्ष नाईक, खैरावचे सरपंच राजाराम घुटुकडे, टोणेवाडीचे सरपंच अशोक टोणे, कुणिकोनूरचे सरपंच लक्ष्मण पाटील, निगडी खुर्दचे उपसरपंच प्रमोद सावंत, सनमडीचे उपसरपंच तम्मण्णा करळे, सनमडीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव सरगर, मनगु सरगर, राजु मोटे, नेताजी पवार भानुदास राजगे, शिवनेरी कॉन्ट्रक्शनचे अध्यक्ष दऱ्याप्पा जमदाडे, लिंबाजी सोलनकर, कुमार जिपटे, तानाजी जमदाडे, विजय शिंदे, गोरख टोणे यांची उपस्थिती होती.
जलपूजनांतर बोलताना आ. जगताप म्हणाले की, दुष्कालग्रस्तांची तहान भागविण्यासाठी म्हैसाळची योजना अर्थात कृष्णेचे पाणी आपल्या भागात आले आहे. टप्प्याटप्याने जसे कामे पूर्ण होतील तसे पाणी परिसरात सोडण्यात येणार आहे.आम्हालाच पाणी पाहिजे असा चुकीचा आग्रह धरून कालवा फोडाफोडी करू नये. कालवा फोडल्यास गुन्हे दाखल होणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी कालवा मार्गावर कलम 144 लागू केले आहे. जतकरांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
सुनिल पवार यांनी खा. संजयकाका पाटील व आ. विलासराव जगताप यांचे मनापासून आभार मानले. सनमडी येथे प्रथमच म्हैसाळचे पाणी आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यानी आनंदोत्सव साजरा केला असून याचे श्रेय त्यांनाच जाते. ऐन दुष्काळात सनमडी भागात दाखल झालेले म्हैसाळ पाणी मनाला संजीवनी देणार असल्याचे सांगत लवकरच येळवी तलावातही पाणी दाखल व्हावे यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करू असेही पवार यांनी सांगितले.
समनडी तलावात आलेल्या म्हैशाळचे पाण्याचे पुजन आमदार विलासराव जगताप,सुनिल पवार व परिसरातील पदाधिकारी, शेतकरी