सोनलगीतील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण अखेर मागे सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांची शिष्टाई

0

जत,प्रतिनिधी: सोनलगी (ता.जत)येथील शेतवस्तीला जाणारा रस्ता खुला करावा या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण आरोग्य सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांच्या शिष्टाईने दुसऱ्यादिवशी मागे घेण्यात आले.उमदी-सोनलगी,हळ्ळी असा बैलगाडी असलेला रस्ता अप्पर तहसीलदारांचे आदेश होऊनही संबधित शेतकऱ्यांने खुला न केल्याने वाटेने जाणाऱ्या 14 शेतकऱ्यांनी मुलाबाळांसह गुरूवार पासून जत प्रांतअधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.
न्यायालयीन प्रक्रियेत हे प्रकरण असल्याने आम्ही काहीही करू शकत नसल्याचे कारण देत प्रशासनाने शेतकऱ्यांना बेदखल केले होते.निर्णय झाल्याशिवाय आम्ही उठणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.अगदी चिमुकले शाळकरी मुलांनी बिगर काहीही न खाता थंडीत प्रांताधिकारी कार्यालयासमोर उघड्यावर रात्र काढली.तरीही दुसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून कोणताही अधिकारी पुढे आला नाही. जतेत बैठकीसाठी आलेले सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांना यांची कल्पना देताच त्यांनी थेट उपोषण स्थंळ गाठत संबधित शेतकरी, अधिकाऱ्यांशी चर्चा केली.शेतकऱ्यांची बाजू भक्कम असल्याने रस्ता खुला करण्यासाठी उच्च न्यायालयापर्यत दाद मागू मी तुम्हच्या बरोबर आहे.असे रवीपाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितल्याने शेतकऱ्यांनी अंदोलन मागे घेतले.दरम्यान प्रशासनाच्या संवेदनाहिन अधिकाऱ्यांनी हेटाळणी केल्याने चिकमुल्या मुलांसह रात्रीच्या थंडीत कुडकुडणाऱ्या शेतकऱ्यांना अंथरून,पाघरून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.

Rate Card

सोनलगी शेतरस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांचे सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.