जत,प्रतिनिधी : जत तालुका फर्टिलायर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संखचे राजाभाऊ कन्नुरे यांची दुसऱ्यावेळी फेरनिवड करण्यात आली.तालुक्यातील कृषी दुकानदारांची नुकतीच जत येथे बैठक झाली.त्यात नव्याने निवडी जाहीर करण्यात आल्या.
अध्यक्षपदाची कन्नुरे यांच्यावर पुन्हा जबाबदारी देण्यात आली आहे. इतर निवडी अशा उपाध्यक्ष रोहन चव्हाण उमदी,परसूराम सांगोलकर शेगाव,सचिव अर्जुन सवदे डफळापूर,सहसचिव सत्यवान मद्रेवार जत,खनिजदार पांडुरंग शिंदे जत,कार्याध्यक्ष सदाशिव जाधव,सदस्य म्हाळाप्पा जावीर,महादेव माळी माडग्याळ,मलकू मल्लाड दरिबडची,अशोक छत्रे डफळापूर,राहुल माने,धान्नाप्पा ऐनापुरे,सिध्दू रसाळ जत,विनोद हलकुडे बोर्गी,बसवराज बाबान्नवर बिंळूर या बैठकीला तालुक्यातील कृषी दुकानदार उपस्थित होते.तालुक्यातील कृषी दुकानदारांच्या समस्या सोडवून,शेतकरी,कृषी दुकानदार संवाद प्रस्तापित करणे,व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहिल असे निवडी नंतर बोलताना कन्नुरे यांनी सांगितले.