साहित्य व सामाजिक क्षेत्रातील गौरव
येळवी,वार्ताहर : येळवी ता.जत येथील सावली फाऊंडेशनच्या वतीने प्राथमिक शिक्षक व लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांना साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल, बहुजन समाज पार्टी तालुकाध्यक्षपदी तानाजी व्हनखंडे,उपाध्यक्ष रोहन साळे शाहू संस्थेच्या वतीने शिक्षिका कविता कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व समाजसेवक सचिन खाडे यांच्या वाढदिवस अशा संयुक्ततिक कार्यक्रमात माजी उपसरपंच तथा सावली फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील साळे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पहार घालत सत्कार करण्यात आला.यावेळी राहुल शिंदे, गजानन पतंगे उपस्थित होते.
मच्छिंद्र ऐनापुरे म्हणाले की,माझ्या शालेय जीवनात गुरुजींच्या मार्गदर्शनाने शिक्षण क्षेत्रात आलो या शिक्षक पेशाबरोबर लिखाणाचं छंद असल्यामुळे सामाजिक ,सांस्कृतिक, शालेय लिखाण चालू असून याची दखल घेऊन इयत्ता आठवी मधील मराठी पाठ्यपुस्तकात माझ्या लिखाणाचा पाठ्य म्हणून समावेश केल्याचा मला अभिमान आहे या पुढील काळात मी असेच कार्य करीत राहणार असल्याचे ते म्हणाले.अतुल कांबळे ,इक्बाल गवंडी, भूपेंद्र कांबळे, अजित पाटील, सुनील साळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी सर यांनी केले तर आभार किरण शिंदे यांनी मानले.
येळवी येथे सावली फाऊंडेशन यांच्या तर्फे मच्छिंद्र ऐनापुरे व तानाजी व्हनखंडे यांचा सत्कार करण्यात आला.