येळवीतील शेतकरी म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत

0

येळवी, वार्ताहर; येळवी(ता.जत)येथील तलावात म्हैसाळचे पाणी सोडावे यासाठी शेतकऱ्यांनी पाणीपट्टी दोन लाख तीस हजार रुपयेचा डिडी जलसंपदा विभागाकडे जमा केला अाहे.त्यालाही अनेक दिवसाचा अवधी ओंलाडला आहे.त्यामुळे आता पाणी कधी येणार याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे.
येळवीतील शेतकरी लिंबाजी सोलनकर यांनी पुढाकार घेऊन सर्व शेतकऱ्यांना सोबत घेत लाभ क्षेत्रात पाणीपट्टी वसूली करत दोन लाख तीस हजार रुपये गोळा केले.ते म्हैसाळ सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांकडे डीडी स्वरूपात भरले आहे.जत मुख्य कॅनालमधून येळवी तलावात पाणी सोडणेसाठी अपुरे काम जे होते. ते पोकलनच्या सहाय्याने चर काढण्यात आली आहे.त्याचबरोबर कठीण ठिकाणी ब्लास्टिंगचा वापर करण्यात आला आहे.कँनॉची चर पुर्ण झाल्याने येळवी तलावात पाणी येण्यास मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांनी तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी लिंबाजी सोलनकर यांनी केली.

Rate Card

जत मुख्य कॉलव्यातून येळवीला पाणी नेहण्याच्या कालव्याचे काम शेतकऱ्यांच्या पुढाकाराने गतीने पुर्ण केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.