गायींची तस्करी करणारा टेम्पो पकडला
जत,प्रतिनिधी: सांगोला येथून विजापूर कडे गा़यी भरून चाललेल्या टेम्पो शेगाव चौकात जत पोलीसांनी पकडला.टेम्पोतील 9 गायीची सुटका केली.या गायीची बाजारा भावानुसा सुमारे दीड लाख रूपये किंमत होते.
अधिक माहिती अशी, सांगोला येथील बाजारात खरेदी केलेल्या 9 गायी घेऊन टेम्पो क्र.एमएच-13,आर-3013हा शेगावमार्गे विजापूरकडे निघाला होता.शेगाव येथे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी जत पोलीसांना यांची माहिती दिली.पोलीस पथकांने घटनास्थंळी जात टेम्पो पकडला. टेम्पोत कोंबलेल्या गायीची सुटका केली. त्यात नऊ गायी कोंबल्या होत्या.त्या पोलीस ठाणे आवारात रात्री उशिरापर्यत बांधल्या होत्या.पोलीस,काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या गायीनां चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.दरम्यान या गायींना घेऊन टेम्पो विजापूर कत्तलखान्याकडे निघाला असण्याची शक्यता आहे. पोलीसांनी टेम्पोसह चालकास ताब्यात घेतले आहे. टेम्पो पकडल्याचे समजातच शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.
जत: पकडलेल्या गायी पोलीस ठाण्यात बांधल्या होत्या.