जतचा दुष्काळ संपविण्यासाठी एकजूट गरजेची :अमृतानंद महास्वामीजी,संख उपोषण तुफान प्रतिसाद

0

संखच्या इतिहासात मोठे अंदोलन : हाजारो नागरिकांचा सहभाग ;उपोषणाद्वारे वास्तव मांडले

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सिंचनापासून वंचित गावांना पाणी आणण्यासाठी एकजूटीने लढा उभारण्याची गरज आहे. असे मत बालगांव मठाचे अमृतानंद महास्वामीजी यांनी व्यक्त केले. ते बेंळोंडगीचे सामाजिक नेते सोमलिंग बोरामणी यांच्या संख अप्पर तहसील समोरील उपोषण प्रंसगी बोलत होते.जत पुर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्यापर्यत जनतेच्या संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे.शासनाने दुष्काळ जाहीर करूनही सुविधा अद्याप दिल्या नाहीत.त्यापार्श्वभुमीवर बोरामणी यांनी संख अप्पर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. उपोषणास तुफान प्रतिसाद लाभला प्रत्यक्षात चारशे शेतकरी,कामगार,ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला तर दिवसभर शेकडो जणांनी उपोषण स्थंळी भेट पाठिंबा दिला.निवेदनद्वावरील सह्याने प्रशासन व लोकप्रतिनीधी हालतील असे अंदोलन प्रथमच संख येथे झाले.अराजकीय असणाऱ्या या उपोषणास अमृतानंद महास्वामीजी यांनी पांठिबा दिला. प्रत्यक्षात तालुक्यातील 75 पेक्षा जादा गावे दुष्काळ प्रभावात आहेत.त्यामुळे येथील दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्यासाठी संघर्षाची गरज आहे. बेरोजगारी,उच्चशिक्षणाचा अभाव,पाणी टंचाई यामुळे येथील शेतकरी,ग्रामस्थांना फटका बसत आहे. शासनाला यांची माहिती देण्यासाठी मीही प्रयत्न करणार असल्याचे शेवटी अमृतानंद महास्वामीजी यांनी सांगितले.

सोमलिंग बोरामणी म्हणाले,आम्ही देश स्वंतत्र झाल्यापासून आम्ही पाणीटंचाईचा सामना करतो आहे.शेती पिकत नाही.जगण्याचे दुसरे साधन नाही.योग्य शिक्षण मिळत नसल्याने आम्हची मुलेही बेरोजगार बनत आहे.जमिनीचे मोठे क्षेत्र असूनही आम्हाला निसर्गाच्या अवकृपेचा ऊसतोड मजूर होण्याची वेळ आली आहे.त्यामुळे आम्हच्या भागातील दुष्काळ संपविण्यासाठी कायमस्वरूपी सिंचनाची व्यवस्था करावी.शासनाला आम्ही भोगत असलेल्या परिस्थिती अवगत करण्यासाठी उपोषण केले आहे. त्यांची दखल घेऊन आमचे प्रश्न सोडवावेत,असेही शेवटी बोरामणी म्हणाले.

Rate Card

कुपनलिकेच्या जीवावर द्राक्ष व डाळिंब जमलेल्या शेतकऱ्यांना नुकतेच अवकाळी पावसामुळे तसे ढगाळ वातावरणामुळे फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागा वाळल्या आहेत. डाळिंब ढगाळ वातावरण तसेच धुक्यामुळे 50 टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बागा नष्ट झाल्या असून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. जत तालुक्यातील हजारो बेरोजगार तरूणांच्या हाताला काम नाही.काम नसल्याने उच्च शिक्षण घेऊनही अनेक तरुण बेघर झाले अाहेत. शासनाने तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागात उद्योग धंदा व कारखाना उभा करावा. तालुक्यातील प्रत्येक गावात तलाठी कार्यालयात संगणकीय व उतारे मिळावेत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सर्वे झालेला रेल्वे लाईनचे काम तात्काळ सुरू करावे. जत तालुक्याच्या पूर्व भागातील म्हैसाळ योजनेत समावेश नसलेल्या गावांचा सर्व्हे करून पाणी देण्याची व्यवस्था करावी.आदी मागण्या या उपोषणाद्वारे करण्यात आल्या आहेत.उपोषण भाजप नेते डॉ.रविंद्र आरळी,सभापती तम्मनगौडा रवीपाटील,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील,जत दुय्यम आवारचे सभापती दयगोंडा बिराजदार, राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, अॅड.चन्नाप्पा होर्तीकर,सिध्दू शिरसाड,संजय तेली,संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग,तालुकाध्यक्ष बसवराज पाटील,संरपच मंगल पाटील,कल्पना बुरकुले,सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे,अंकूश हुवाळे,चंद्रकात गुड्डोडगी,आदीसह पुर्व भागातील 42 गावातील संरपच, उपसंरपच, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.सांयकाळी पाच वाजता अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांच्याकडे निवेदन देऊन उपोषण मागे घेण्यात आले.

अमृतानंद महास्वामीजी उपस्थिती

जत पुर्व भागातील दुष्काळाची परिस्थिती भहवाह अाहे. देश स्वंतत्र झाल्यापासून यात काहीही फरक पडत नाही.प्रशासन,राजकर्ते अपयशी ठरले आहेत.त्या पार्श्वभूमीवर बोरामणी यांच्या उपोषणास अध्यात्मातील बडे प्रस्त असलेले बालगांव मठाचे अमृतानंद महास्वामीजी यांनी उपस्थिती लावली.त्यांनी कन्नड भाषेतून परिस्थिती मांडली.

सामाजिक कार्यक्रर्ते बोरामणी यांच्या संख येथील उपोषणास तुफान प्रतिसाद मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.