जत,प्रतिनिधी: अनेक दिवसापासून पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या जनतेला पाणी मिळावे हा स्वच्छ उद्देशाने यासाठी मी प्रयत्न करतोय.पाणी हा सध्या महत्वाचा विषय आहे.त्यातही पत्रकबाजी करून काहीमंडळी धन्यता मानत आहेत.मुळात पाणा परिषदा,दहा वर्षे पाठपुरावा केला म्हणणाऱ्यांनी कसा प्रयत्न केला हा संशोधनाचा विषय असल्याची टिका माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केली.अरोपप्रत्यारोपा पेक्षा कर्नाटकातून कसे पाणी आणता येईल हे पहावे असे आवाहन त्यांनी केले.
जमदाडे म्हणाले,मागील दहा वर्षापासून आमचे विरोधक कर्नाटकातून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगतात.मग केंद्र,दोन्ही राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता असताना का पाणी आले नाही.नेमके कशामुळे दहा वर्षात हे काम करता आले नाही.तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या योजनेसाठी 10 कोटीचा निधी दिल्याची घोषणा केली होती. त्यांचे काय झाले,त्या निधीतील एक दमडीतरी आली का? आघाडी सरकार असताना योग्य पाठपुरावा केला नाही.कर्नाटकचे तत्कालीन जलसंपदा मंत्री जतला पाणी देण्यासाठी सकारात्मक होते.मात्र महाराष्ट्र शासनाकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.मोठ्या दिमाखात पाणी परिषदा घेण्यात आल्या.मंत्रीमहोदयांची उपस्थिती फक्त दिखावा केला.त्यातून दहा वर्षात काहीही साध्य झाले नसल्याचा आरोप जमदाडे यांनी केला.मागील चार वर्षात भाजपचे सरकार सिंचन योजनेतून नागरिकांना पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.जिल्ह्याचे कतृव्यदक्ष खा.संजयकाका पाटील, आ.विलासराव जगताप जत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यतचा भाग सिंचनाखाली आला पाहिजे यासाठी काम करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील म्हैसाळ योजनेसाठी मोठा निधी उपलब्धं झाला आहे.त्यातून कालव्याची कामेही गतीने सुरू आहेत.कालवे पुर्ण झालेल्या गावातील ओढापात्रे,बंधारे,तलावात पाणी सोडले जात आहे. त्याशिवाय पुढील टप्यातील कामातही मोठी गती आली आहे. पुर्व भागातील वंचित गावांना कर्नाटकतून पाणी मिळावे म्हणून आ.विलासराव जगताप यांनी 2016 ला पाठपुरावा केला आहे. गतवर्षी दोन्ही राज्यातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शासनास प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत.कर्नाटकातून जत तालुक्यातील पुर्व भागातील गावांना पाणी येऊ शकते हे त्यांनी प्रशासनाला पटवून दिले आहे. सध्या महाराष्ट्र शासन कर्नाटकाला एक टिएमसी पाणी विनाअट देते.त्याबदल्यात पुर्व भागाला पाणी द्यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.विरोधकांनी टिका करण्यापेक्षा पाणी आणण्यासाठी त्यांचीही ताकत लावावी.असेही जमदाडे यांनी आवाहन केले.