टँकरचा जीपीएस पासवर्ड खुला तुषार ठोंबरे : कोणत्याही नागरिकांला टँकरचे लोकेशन पाहता येईल
जत,प्रतिनिधी: टंचाईग्रस्त गावांना देण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यन्वित आहे.आता सदर जिपीएसचा कोड खुला करण्यात आला आहे. त्यामुळे टँकरचे लोकेशन व माहिती कोणत्याही नागरिकांना पाहता येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी टंचाई आढावा बैठक दिली.
जत येथे टंचाई आढावा बैठक पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. यावेळी तहसीलदार सचिन पाटील, बिडिओ अर्चना वाघमळे, उपविभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत,अॅड.प्रभाकर जाधव, सुनिल पवार, नाथा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.विलासराव जगताप म्हणाले,बेकायदेशीर म्हैसाळ योजनेचे कालवे फोडणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. कालवा परीसरात 144 कलम लावून जमावबंदी आदेश देऊन कालव्यातून नियोजितस्थंळी पाणी पोहोचावे यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा असे आवाहन केले.
तालुक्यात सध्या प्रंचड दुष्काळी परिस्थिती उद्भवली असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना गंभीर्य नाही. अनेक कामे परत-परत सांगावे लागत आहेत. सध्या पाणी टंचाई काळात विजपुरवठा व्यवस्थित करावा, टँकर मागणी असलेल्या गावात तातडीने टँकर सुरू करावेत.त्याशिवाय दुष्काळी सुविद्या देण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे अशा सुचना आ. जगताप यांनी दिल्या. तसेच तालुक्यातील संरपचाची प्रत्येक महिन्याच्या सोमवारी बेठक घेऊन आढावा घ्यावा,तर शेवटच्या सोमवारी अधिकाऱ्यांची बैठकीत संरपचाच्या आलेल्या सुचना, तक्रारीचा आढावा घेत उपाययोजना कराव्यात असेही यावेळी आ.जगताप यांनी बैठकीत सांगितले.

