ऊस वाहतूक करणाऱ्या टँक्टरची टॉली पलटी झाल्याने दोन वर्षाचा मुलगा ठार

0

बोर्गी,उमदी,वार्ताहर: पंढरपूर-विजापूर रोडवरील बोर्गी फाटा येथे ऊस वाहतूक करणाऱ्या टँक्टरचे मागील टॉली बाजूला उभे राहिलेल्या चिमुकल्या बहिण भावाच्या अंगावर कोसळल्याने दोन वर्षाचा चिमुकला ठार झाला.बहिण गंभीर जखमी झाली.श्रेयस संतोष खवेकर रा.हळ्ळी असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी,बोर्गी परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस मंगळवेढा तालुक्यातील कारखान्याकडे नेहत असलेला टँकरची मागील टॉली बोर्गी फाटा येथील चौकातील झेंड्याचा कठडा चुकवत चढ चढताना मागील टॉली उलटली.त्यावेळी रस्त्यापासून वीस फुट अंतरावर हळ्ळीकडे जाण्यासाठी आई व आजीसह श्रेयस व त्यांची मोठी बहिण थांबली होते.टॉलीतील ऊस थेट त्यांच्या अंगावर पडल्याने दोघे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचार्थ सोलापूर येथे नेहत असताना श्रेयसचा मुत्यू झाला.बहिणीवर उपचार सुरू आहेत.तसेच बाजूला उभ्या मँक्स जीपवरही ऊस पडल्याने जीपचे 40 हाजार रूपयाचे नुकसान झाले आहे.दरम्यान बेजबाबदारपणे ऊस वाहतूक ऐरणीवर आली आहे.त्यात बोर्गी फाटा येथील झेंड्याचा कठडा,व धोकादायक चढ अजून किती निष्पाप जीव घेणार असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.याबाबतचा गुन्हा उमदी पोलिसात दाखल झाला आहे.

Rate Card

बोर्गी : येथे चढ चढताना पलटी झालेली टँक्टरची टॉली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.