माडग्याळ,वार्ताहर : सोन्याळ ता.जत येथील पाणीपुरवठा योजनेचे काम तत्कालीन कॉग्रेस नेत्यांनी दर्जाहीन केले आहे.त्यामुळे सतत दुरूस्ती कामामुळे योजना बंद ठेवावी लागत आहे. कॉग्रेसच्या सत्ता काळातील बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कॉग्रेस आरोप करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करावे असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याकडून दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे,यापुढे शासनाचे टँकर व योजनेतून नियोजन बध्द पाणी पुरवठा केला जाईल असे ग्रामपंचायतीकडून दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.सोन्याळ गाव भाग व वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी दोन योजना करण्यात आल्या आहेत.त्यात प्रादेशिक व जलस्वराज्य दोड्डनाला प्रकल्पा मागील विहिरीतून पाणी उचलून 12 किलोमीटर वरील सोन्याळ येथील टाकीत आणण्यात येते.या दोन्ही योजना कॉग्रेस कार्यकाळात झाल्या आहेत.दोन्ही कामात पाणी वाहक पाईप दर्जाहीन वापरल्या आहेत.त्यामुळे त्यां सतत फुटत आहेत.त्या दुरूस्ती झाली वेळ जातो.त्याशिवाय योजनेच्या विहीर लगत दुसरी विहीर काढून योजनेच्या पाईपलाईन फोडून पाणी पुरवठ्यात अडथळा आणला जात आहे.यांचा ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. भाजपची सत्ता येऊन वर्षाचा कालावधी झाला आहे. आम्ही ग्रामस्थांना सुरळीत व पुरेल एवढा पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.त्यासाठी योजनेला कायम वीज पुरवठा व्हावा यासाठी उच्च क्षमतेचा स्वंतत्र टिसी मंजूर करून घेतला आहे. ज्या गल्लीत पाणा जात नव्हते तेथे नव्याने पाच लाख रूपये खर्चून नव्या पाईपलाईन टाकल्या आहेत.वाड्यावस्त्यांना पाणी देण्यासाठी ऱाष्ट्रीय पेयजल योजनेतून पावनेतीन लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.याशिवाय अन्य उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तरीही कॉग्रेसच्या मंडळीकरून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.ते सत्ता नसल्याच्या निराशेतून आहेत.असेही पत्रकात शेवटी म्हटले आहे.