जत,प्रतिनिधी : गुड्डापूर श्री.धानम्मादेवी देवस्थान यात्रेच्या पाश्वभूमीवर जिल्हाअधिकारी विजय काळमपाटील यांनी आढावा बैठक घेतली.यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारे पाणी टंचाई भासणार नाही.प्रशासनाच्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत.असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तालुक्यातील अधिकारी,संरपच चंद्रशेखर पुजारी,देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रकाश गणी,सचिव विठ्ठल पुजारी सदस्य, ग्रामसेवक अनिल ओलेकर या बैठकीला उपस्थित होते.बैठकीत जिल्हाधिकारी यांनी यात्रेच्या सर्व नियोजनाचा आढा घेतला.संरपच हिरेमठ यात्रेत पाणीटंचाई भासणार असल्याने याबाबत प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन केले.जिल्हाधिकारी यांनी यात्रेच्या पाश्वभूमीवर चार टँकर मंजूर केले आहेत.तर देवस्थान कमिटी चार टँकरची व्यवस्था करणार आहे. अंकलगी तलावाखालील विहिरीमधून टँकर भरण्याची सुचना करण्यात आली.दरम्यान यात्रेनिमित्त विविध स्टॉलची उभारणी सुरू झाली आहे. अनेक व्यवसायिक गुड्डापूरला येऊ लागले आहेत.