जवान श्रावण व्हनखंडे अंनतात विलिन शेगाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

0

जत,प्रतिनिधी: शेगाव ता.जत येथील जवान श्रावण उर्फ विजय भाऊसाहेब व्हनखंडे वय-28 यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान व्हनखंडे यांचे आजाराने निधन झाले होते.सध़्या ते जम्मू येथे सेवा बजावत होते.नुकतेच ते गावी आले असताना आजारी पडले.पुणे येथील सैनिक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.शुक्रवार ता.30 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या निधनाची बातमी समजताच शेगाव परिसरात शोककळा पसरली. शनिवारी सांयकाळी त्याचे पार्थिव शेगाव येथे आणण्यात आले.पार्थिव बघताच आई-वडील,भाऊ व नातेवाईकांनी हबंरडा फोडला.उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले.गावातील चौकात अंत्यदर्शनासाठी काहीवेळ त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले.त्यावेळी मोठा जनसागर लोटला होता. फुलानी सजविलेल्या गाडीतून त्यांच्या पार्थिवाची श्रावण व्हनखंडे अमर रहे’ ‘भारत माता की जय’अशा घोषणा देत

अत्यंयात्रा काढण्यात आली.रात्री आठ वाजता स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Rate Card

मुळ शेगावचे असलेले श्रावण व्हनखंडे 2010 मध्ये  भारतीय सैन्यदलात भरती झाले होते.कसम परेडनंतर त्यांची पहिली नियुक्ती मध्यप्रदेश राज्यातील सागर येथे झाली.तेथे तीन वर्षे त्यांनी सेवा बजावली.गत पाच वर्षापासून ते जम्मू येथील लष्करी दलात सेवा बजावत होते.मंगळवार दि.27 रोजी प्रकृती बिघडल्याने त्यांना पुणे येथील सैनिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असताना शुक्रवार दि.3 रोजी उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. मंगळवार दि.20 नोव्हेंबर रोजी ते गावी आले होते. त्यांच्या पश्चात आई,वडील,दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे.

शेगाव ता.जत येथील जवान श्रावण व्हनकंडे यांच्या पार्थिवाची अत्यंयात्रा काढण्यात आली. रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.