आंवढी,वार्ताहर : आंवढी परिसरात संध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे वायफळ ते आंवढी पर्यतच्या पोट कालव्याचे काम करून म्हैसाळ योजनेचे पाणी सोडवे अशा मागणीचे निवेदन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खा.संजयकाका पाटील यांना आंवढीकरांनी दिले.
आंवढी परिसरात सतत अवर्षण असते.अनियमित पावसामुळे येथे दुष्काळ कायम आहे.शेती,जनावारांसह पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे.म्हैसाळ योजनेच्या वायफळ आंवढी पोट कालव्यातून आंवढीला पाणी देण्याचे नियोजन आहे.पोट कालव्याचे सर्व्हेशनही झाले आहे.त्या कालव्याचे गतीने काम करून पाणी सोडावे,त्यामुळे आंवढीची पाणी टंचाई संपेल.असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी उपसरपंच आण्णासाहेब बाबर,माजी चेअरमन माणिक पाटील, मधुकर कोडग,पांडुरंग कोडग,पाटलू कोडग,सुरेश कोडग,बाळासो कोडग, संभाजी कोडग,सतीश कोडग आदी मान्यवर उपस्थित होते.