व्हसपेठमध्ये घरातील गँसचा स्फोट,दोन लाखाचे नुकसान

0

माडग्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील व्हसपेठ येथील शिवाजी मनू गायकवाड यांच्या घरातील गॅसचा स्फोट होऊन सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले.अचानक झालेल्या घटनने गायकवाड कुंटुबिय बेघर झाले आहेत.

स्फोटाचे कारण समजू शकले नाही. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.गुरुवार सकाळी गायकवाड आंवढी येथे गेले होते.पत्नी पमाबाई शिवाजी गायकवाड घरातील गाने आवरून शेतात शेळ्यांना चारा आणण्यासाठी शेतात गेल्या असताना अचानक गॅसचा स्फोट झाला.घरातील सर्वजण घराचे बाहेर असताना अचानक गॅसचा स्फोट झाल्याने जीवित पानी टळली.स्फोटात घरातील फ्रिज,एलइडी,सोन्याचे दागिणे, नवीन घर बांधण्यासाठी ठेवलेले एक लाख तीस हजार रुपये,महत्वाची कागदपत्रे,दोन पोती,ज्वारी,शेंग पेंड, 5 हजार रुपये किंमतीचा प्लास्टिक कागद जाळून खाक झाला आहे.गावकामगार तलाठी यांनी पंचानामा केला आहे . 

Rate Card

 व्हसपेठ ता.जत येथील शिवाजी गायकवाड यांचे गैस स्फोटात घर जळून खाक झा ले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.