जत,प्रतिनिधी : मागील चार वर्षात जत पोलीस ठाण्याचा चौथा अधिकारी लाचेच्या प्रकरणात अडकल्याने जत पोलीसाचा कारभार चव्हाट्यावर आहे.तालुक्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या भ्रष्ट कारभाराची ही पोहचपावतीच असून रक्षकच भक्षक बनले असल्याची प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहे.
मागील काही वर्षात जत व उमदी पोलीस ठाणे वादाचे केंद्रबिंदू ठरले आहे.पोलीसाच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात अनेक अंदोलने झाली आहेत.स्वता: आ.विलासराव जगताप यांनी जत तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, अवैद्य धंदे, वाळू तस्करी यांना पोलीस अधिकारी संरक्षण देत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी पोलीस ठाण्यासमोर अंदोलन ही केले. तसेच विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यांनतर वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली.
मागील चार वर्षात जत पोलीसाच़्या भ्रष्ट कारभाराचा कळस झाला आहे. दुष्काळाने वैतागलेल्या जनतेला लुबाडण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे.किरकोळ शिवीगाळ मारहाण प्रकरणातही पोलीसाकडून पंचवीस ते पन्नास हाजार रूपयाची मागणी होत असल्याची चर्चा सुरू असते.कारवाई पेक्षा तडजोडी करण्यात पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचारी तरबेज झाले आहेत. त्यांची नेहमीच चर्चा होत असते.
जत पोलीसानी भ्रष्ट कारभाराचा कळस झाला असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे.सहा.पोलीस निरिक्षक गजानन कांबळे हा लाच प्रकरणात अडकलेला चौथा अधिकारी आहे.विशेष म्हणजे मागील केवळ चार वर्षातील ही आकडेवारी आहे.यापुर्वी शेख नावाच्या एका सहा.पोलीस निरिक्षक कडे जत पोलीस ठाण्याचा कार्यभार असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून त्यांने लाच स्विकारली आणी खाकी वर्दीवर भष्ट्राचाराचे शिंतोडे उडविले.त्याच प्रकरणाची पुर्नावर्ती गजानन कांबळे यांनी केली. पोलीस ठाण्यात डुटीवर असताना लाचलुचपत प्रतिंबधक विभागाच्या जाळ्यात तो अडकला.यापुर्वी सिमा आघाव नावाची महिला उपनिरिक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडली होती. त्यानंतर विजयसिंह घाडगे नावाचा उपनिरिक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडला होता.उमदी पोलीस ठाण्याचाही एक अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला होता.आतापर्यत
तब्बल पाच अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने जत पोलीस ठाण्यातील खाकी वर्दी भष्ट्राचाराच्या डागाने डागाळली आहे.जनतेचे रक्षक म्हणून कर्तव्य व देशनिष्ठेची शपथ घेणारे पोलीस अधिकारी किती रसातळाला पोहचले आहेत.यांचे हे मुर्तीमंत उदाहण आहे.