कर्नाटकातील दोन किमीटरवरच्या कँनॉलमधून जत पुर्व भागात पाणी सोडा : आ.जगताप

0

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील पुर्व भागात सध्या भिषण पाणी टंचाई आहे.त्यामुळे दोन किलोमीटवरील लगतच्या कर्नाटकातील यत्नाळ जिल्हा विजापुर येथे आलेल्या पाणी योजनेचे पाणी सोडावे अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

जतचा पूर्व भाग हा विजापूर कर्नाटक राज्याशी सलग्न आहे. विजापुर जिल्ह्यातील यत्नाळ हे गाव जत सेमेवर केवळ 2 कि मी अंतरावर आहे. सद्या यत्नाळ बंधाऱ्यामध्ये कर्नाटकचे पाणी येते त्यामुळे तेथुन ओढ्याला पाणी सोडल्यास पूर्ण भागातील 20 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे यत्नाळ जिल्हा विजापुर कर्नाटक राज्य येथून पिण्यासाठी पाणी प्रवाही पध्दतीने सोडल्यास हा प्रश्न कायमचा निकली निघेल. ही गोष्ट लक्षात घेऊन आमदार विलासराव जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना कर्नाटक राज्याला पाणी देताना जत तालुक्यासाठी एक टीएमसी पाणी देण्याची अट घालूनच पाणी द्यावे या आशयाचे पत्र दिले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.