संख | म्हैसाळ योजनेतून वचिंत गावासाठी सर्व्हेशन सुरू |

0

संख,वार्ताहर : म्हैसाळ योजनेच्या पुर्व भागातील वंचित गावांना पाणी मिळावे यासाठी पाटबंधारे विभागाकडून सर्व्हेशनाच्या काम सुरूवात झाली. त्याचे उद्घाटन शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अंकूश हुवाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी तम्मासो कुलाळ,शिवसेना नेते श्रीमंत करपे,सिद्धू गायकवाड,नाना कुटे,संभा जाधव,ज्ञानेश्वर कुटे,सुखदेव सूर्यवंशी माडग्याळचे ग्रा.प.सदस्य जेटलिंग कोरे,महादेव माळी,सीताराम जाधव,जेटयाप्पा कोरे,लिंबाजी माळी,सुखदेव माळी,दारीबडचीचे हरिचंद्र कांबळे,अमोघसिद्ध शेंडगे,जोतीबा जाधव,कुलाळवाडीचे धोंडीबा बोरकर , पिंटू नेमाने , जयवंत तांबे खंडनाळ चे अप्पासाहेब थोरात,भारत टेंगले,राम घुमरे,रेवण कुलाळ आदी मान्यवर उपस्थित होते.म्हैसाळ योजनेतून माडग्याळ सह आठ गावाला व गुड्डापूर,संख,दारीबडची,तिल्याळ,सिद्धनाथ,मोटेवाडी, तिकोंडी हे तलाव भरण्यासाठी अखेर शिवसेनेच्या प्रयत्नातून कालव्याचे सर्व्हेशनाचे काम चालू झाले आहे.येत्या पंधरा दिवसात अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. त्यामुळे पुर्व भागातील गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांच्या प्रयत्नातून हे सर्व्हेशन करण्याच येत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.