दुष्काळाने पाचवीला पुजलेला कोयता सुटणार कधी ; गोपीचंद पडळकर

0

समाजबांधवानी एकत्र येत मथंन करण्याची गरज

माडग्याळ,वार्ताहर:  दुष्काळाने पाचवीला पुजलेला कोयता घेणाऱ्या ऊसतोड मजूर व पाठीवरची पोती वाहनाऱ्या हमालाची कधी बंद होणार,पिठ्यान् पिठ्या हे दरिद्री जीवन जगण्याची वेळ आपल्यावर आली आहे.यापुढे हे बदलविण्यासाठी मंथन करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व मतभेद विसरून एकत्रित येऊन संघर्ष करू असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली. कुलालवाडी ता.जत येथील श्री.खंडोबा (म्हातरबा) देवाची यात्रेनिमित्त आयोजित सभेत पडळकर बोलत होते.यावेळी सभापती तमाणगोंडा रवी पाटील,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी,अशोक बन्नेवर,अजित पाटील,कामाणा बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यांतील धनगर समाजाचे आराध्य देवत असणाऱ्या कुलालवाडी येथे श्री.खंडोबा (म्हातरबा) देवाची मोठी यात्रा भरते.सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात यांत्रेचे धार्मिक कार्यक्रम पार पडले.यात्रेनिमित्त गोपीचंद पडळकर यांच्या सभेचे आयोजन केले होते.मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
पडोळकर पुढे म्हणाले,सततचा दुष्काळ यामुळे जतसह जिल्ह्यात दुष्काळी विघ्न मागे लागलं आहे.पिण्यासाठी पाणी नाही,जनावरांना चारा नाही,पिके आली नसल्याने खायाचं काय,कायम आठरा विश्व दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या या भागातील जनतेला बदलवयाचा विडा मी उचलला आहे.नुसते राजकारण न करता समाजातील नवी पिठी यापुढे सक्षम जीवन जगली पाहिजे.अनेक पिढ्याचा कोयत्यातून कधी सुटका होणार आहे.ऊसतोड,हमालीत अनेक पिठ्या खर्ची झाल्या आहेत.समाजाच्या मागास पणावर मंथन करण्याची वेळी आली आहे. त्यामुळे सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र येऊया.धनगर आरक्षण,समाजाचे प्रश्न,दुष्काळ संपविण्यासाठी संघर्ष करण्याची यापुढे गरज आहे. सरकार मागून काय देणार नाही.संघर्षाने ते हिसकाऊन घेण्याची तयारी ठेवा.यापुढच्या पिठीला चांगले दिवस येतील यासाठी युवकांनी चांगले शिक्षण घ्यावे.यांच मातीत अधिकारी घडत आहेत.त्यामुळे समाजातील सर्व तरूणांनी शिक्षणाबरोबर आपण बदलले पाहिजे यासाठी प्रयत्न करावा.असेही पडळकर शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन पिंटू नेमाने व त्यांचे सहकार्याने केले.

Rate Card

कुलाळवाडी ता.जत ये थे आयोजित सभेत बोलताना धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व माऩ्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.