मोरबगी येथे धारदार शस्ञ घेऊन फिरणाऱ्या एकास अटक

0
Rate Card

उमदी,वार्ताहर : मोरबग्गी ता.जत येथे धारदार शस्ञ घेऊन फिरणाऱ्या म्हाळाप्पा भिमाण्णा माळी(वय-36) याला उमदी पोलीसाच्या पेट्रोलिंग करणाऱ्या टिमने ताब्यात घेतले.त्याकडील धारदार तलवार,मोटारसायकल जप्त केली आहे.

तालुक्यातील चोरीच्या वाढत्या घटनाच्या पाश्वभुमीवर उमदी पोलीसाचे पेट्रोलिंग सुरू आहे. मोरबग्गी येथील जि.प.शाळेजवळ म्हाळाप्पा माळी हा संशयास्पद फिरताना आढळला त्याला पोलीसांनी ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडे धारदार तलवार आढळून आली.पोलीसांनी तलवारीसह त्यांची दुचाकी एमएच-10,बिके-5839 जप्त करत त्याला अटक केली अाहे.बेकायदा शस्ञ बाळंगणे आदी प्रकारचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.सा.पोलीस निरिक्षक भगवान शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली हवलदार दिपक चौगुले,श्री.कोळी यांनी कारवाई केली.अधिक तपास हे.कॉन्टेबल तात्यासाहेब बामणे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.