जत,प्रतिनिधी : जत शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील भोंगळ कारभार सुरू आहे. अनेक विभागाला शिक्षक नाहीत.शैक्षणिक दर्जा सुमार झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे भविष्य अंधकारमय झाले आहे.तातडीने संबधित विभागाने लक्ष घालून शिक्षकांच्या नेमणूकीसह दर्जा सुधारावा अन्यथा तीव्र अंदोलन करू असा इशारा युवक कॉग्रेसच्या वतीने देण्यात आला.शुक्रवारी 22 रोजी संस्थेस युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली.त्यावेळी संस्थेतील वेल्डर विभागला गेले अडीच महिने शिक्षकच नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठे नुकसान होत आहे. जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने व जिल्हा महासचिव रमेश कोळेकर यांनी भेट देऊन उघडकीस आणला.जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे म्हणून शासनाने शहरात सुसज्ज प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे.जत येथील संस्थेत सध्या 5 विभाग सुरू आहेत.शेकडो विद्यार्थी येथे शिकत आहेत.शुक्रवारी युवक कॉग्रेसच्या टिमने संस्थेस भेट दिली असता,2 शिक्षक उपस्थित होते.गत वर्षापासून प्राचार्य पद रिक्त आहे.उपस्थित शिक्षकांना अन्य शिक्षक व संस्थेच्या कामकाजा विषयी माहिती विचारली असता उडावाउडवीचे उत्तर दिली.संस्थेचे सर्व कारभार गोंधळाचा व अनियमितता आढळूंन आली.शिक्षकाविना विद्यार्थींचे मोठे नुकसान झाले आहे.यावेळी वेल्डर विभागातील शिक्षक नसल्याबाबत विद्यार्थ्यांनी लेखी तक्रार दिली. यावेळी विकास माने,रमेश कोळेकर,अनिल पाटील, राहूल बुवा यांनी भेट दिली.1 डिंसेबर पर्यत संस्थेच्या वरिष्ठ कार्यालयाने लक्ष घालून कारभार सुधारावा अन्यथा युवक कॉग्रेसच्या वतीने विक्रम सांवत यांच्या नेतृत्वाखाली अंदोलन करण्याचा इशारा यावेळी विकास माने यांनी दिला.
जत शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कारभार सुधारावा या मागणीचे निवेदन युवक कॉग्रेसच्या वतीने देण्यात आले.