शेगावात दरोडा : चार पथके रवाना,स्थानिक गुन्हे शाखा,गुंडाविरोधी पथक,जत पोलीस असा संयुक्त तपास

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शेगाव येथील व्यापारी साहेबराव विठ्ठल शिंदे यांच्या घरावर सात जणाच्या टोळीने सशस्ञ हल्ला दरोडा प्रकरणी पोलीसाकडून गतीने तपास सुरू आहे. पोलीसांची चार पथके विविध भागात छापामारी करत आहेत.तालुका व तालुका बाहेरील काही रेकार्ड वरील गुन्हेगारांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.स्थानिक गुन्हे शाखा,गुंडाविरोधी पथक,जत पोलीस अशी चार पथके संयुक्त तपास करत आहेत.बुधवारी मध्यरात्री पंढरपूर-जत रोडवरील शेगाव नजिक रोडला लागून असलेल्या शिंदे यांच्या घरावर सात-आठ जणांच्या टोळीने रिव्हालवराचा धाक दाखवून दरोडा टाकत तीन लाखाच्या रोकडसह सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल पळविला होता.गुन्हा दाखल होताच पोलीसांनी गतीने तपास सुरू केला आहे.जत पोलीसासह,स्थानिक गुन्हे पथक,डॉग स्कॉड,फिंगर प्रिंटचे टिमने घटनास्थंळी भेट देऊन नमुने घेत तपास सुरू केला आहे. पोलीसाच्या चार टिमद्वारे वेगवेगळ्या भागात दरोडेखोराचा शोध घेत आहेत.अत्याधुनिक तंत्रज्ञ्यानाचा वापर करूनही पोलीस तपास करत आहेत. शुक्रवारी तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थंळी भेट दिली.परिसरात अन्य कोणत्या ठिकाणी सीसीटिव्ही आहेत का,दरोडेखोरांच्या हालचाली कुणी बघितल्या आहेत का यांची चौकशी केली जात आहे. दरम्यान घटनेने परिसरात खळबंळ उडाली आहे.रिव्हालवरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत दरोडेखोर घरात घुसत असल्याने भितीचे वातावरणात पसरले आहे.

रस्त्याकडेला घर असूनही दरोडेखोेरांचे धाडस

जत-पंढरपूर रस्त्यावरील बोरडे पेट्रोल पंपासमोर असणारे शिंदे यांचे घर अगदी रस्त्याकडेला आहे.तरीही दरोखोरांनी येथे दरोडा टाकण्याचे धाडस केले.चोरीवेळी घरीसमोरील सीसीटीव्हीत रस्त्यावरून वाहने गेल्याचे दिसते.घराच्या पुढील बाजूस रस्त्यावर चारचाकी वाहन लावून त्यांच्या हेडलाईटचा उजेड घरावर पाडला होता.प्रांरभी तोंजाला माक्स लावलेला एकटा दरोडेखोर घरीसमोरील परिस्थितीचा अंदाज घेऊन गेल्याचे दिसते.त्यानंतर तोंड बांधलेले अन्य दोघे जणांकडून घरालगत असणाऱ्या बाथरूमवरील विजेचा बल्प काहीतरी टाकून झाकल्याचे स्पष्ट दिसते.त्यानंतर आरामात घरासमोर येत सीसीटीव्ही भिंतीकडे फिरविण्यात पर्यत चोरट्याच्या हालचाली स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसते आहे.काही अन्य घटनेची गुन्हेगारीची तपासणी केल्यास वर्णनावरून दरोड्याचा तपास लागू शकतो.मात्र तसा तपास पोलीस यंत्रणांनी करणे गरजेचे आहे.

Rate Card

पोलीस चौकी पुन्हा रडारवर

परिसरातील सुरक्षेची जबाबदारी असणारी पोलीस चौकी कायम बंदने अवैद्य धंद्याना बंळ या मथळ्याखालीचे वृत्त संकेत टाइम्स मध्ये प्रसिध्द झाले होते.त्यांची दखल घेत दुसऱ्यादिवशी चौकी उघडण्यात आली.पुढे काही दिवस सुरू होती.मात्र घटनेच्या अगोदर आठवडाभर चौकीचे कुलूप कायम होते. त्यामुळे पोलीसांच्या या बेजबाबदारपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.जत- पंढरपूर हा आता राज्यमहामार्ग झाला आहे. रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे.रात्री बेकायदेशीर वस्तूची वाहतूक केली जात आहे.चोऱ्या,दरोडा सारख्या घटना सतत घडत आहेत.त्यामुळे येथील चौकी मुंचडीच्या धर्तीवर चौवीस तास कायमस्वरूपी पोलीस नेमूण चालू ठेवावी अशी मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.