जत,प्रतिनिधी : खोजनवाडी (ता. जत) गावात एका विवाहित महिलेने द्राक्ष बागेवरील फवारण्यासाठी आणलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मंदाकिनी सिध्दाप्पा बिराजदार (वय-23, मुळ गाव मेंढीगिरी) असे मयत विवाहितेचे नाव आहे. बुधवारी सकाळी 8.30 वाजता ही घटना उघडीस आली. घरातील किरकोळ भांडणाच्या कारणातून मंदाकिनी हिने आत्महत्या केल्याची गावात चर्चा सुरू होती. याबाबत जत पोलिस ठाण्यात पती सिध्दाप्पा बिराजदार यांनी फिर्याद दिली आहे. सिध्दाप्पा व मंदाकिनी यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना तीन वर्षाचा मुलगा आहे. याचा अधिक तपास जत पोलिस ठाण्याकडील माने करत आहेत.