तालुक्यातील सात गावातील समाज मंदिर बांधकामासाठी 70 लाखाचा निधी उपलब्धं ; आ. विलासराव जगताप यांची माहिती

0

जत,प्रतिनिधी:  तालुक्यतील सात गावाला दलित वस्ती सुधार योजनेतून 70 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या गावातील ही कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमदार विलासराव जगताप यांनी दिली.
आ.जगताप म्हणाले, मागील पावसाळी अधिवेशनात  तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या दलित समाजाला दलित वस्ती सुधार योजनेतून जतला भरीव निधी द्यावा अशी मागणी मी शासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत शासनाने तालुक्यातील संख, बिळूर,तिकोंडी, डफळापूर, उटगी, आकलवाडी व गिरगाव या सात गावात दलित वस्तीत समाज मंदिर बांधण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रूपयाचा निधी मंजूर केला आहे.
यापूर्वीही जत तालुक्याला जिल्हा नियोजन,14 वा वित्त आयोगातून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत भरीव निधी मिळाला आहे. भविष्यातही जत तालुक्यात भरीव निधी शासनाकडून आणू अशी ग्वाही आ. जगताप यांनी दिली.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.