माडग्याळ,वार्ताहर:माडग्याळ (ता-जत)येथील तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. योजनेचे पाणी स्रोत आटल्याने योजना बंद आहे.सध्या गाव भाग व वाडी वस्तीवर आठ कुपनलिका गामपंचायतीने अधिग्रहण करून ग्रामस्थाना पाणी पुरवठा केला जात आहे. पंरतू संध्या तेही पाणी अपुरे पडत आहे.गामपंचायतीने ट्रँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयास दिला आहे.तीव्र पाणी टंचाई असतानाही प्रशासनाने अद्याप टँकर दिला नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.त्याशिवाय जनावरांना खाण्यास चाराही नाही. नागरिकांना पिण्यास पाणी नाही.अशा भहवाह परिस्थितीत माडग्याळकर नागरिक जगत आहेत.चारा व पाण्याअभावी शेतकरी जनावरे येईल त्या किंमतीला विकत आहेत.
दुष्काळाची दाहकता वाढली आहे. वाडीवस्तीवर पाणीटंचाई दोन कूपनलिका अधिग्रहण करण्यात आले आहे.गावात पाणी विकत घ्यावे लागत आहे. गेली चार वर्षापासून अपेक्षित पाऊस झालेला नाही.त्यामुळे विहीर, तलाव,कूपनलिका कोरडे पडले आहे. रब्बी हंगामातील ज्वारी,मका, पिकांना पाणी नसल्याने पिके वाळली आहे.सुमारे 300 हेक्टर डाळिंब बागाचे क्षेत्र आहे. पाणी टंचाई मुळे ते बागा वाळून गेल्याने नष्ट झाले आहे. त्यामुळे माडग्याळ गावातील शेतकरी पाणी टंचाई मुळे चिंताग्रत झाला आहे.गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी,खाण्याचे धान्ये,जनावरांचा चारा विकत घ्यावे लागत आहे.त्यामुळे जगणे यज्ञ बनले आहे.अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकरी गाव सोडतील अभी स्थिती आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.