संख परिसरात अवैध दारू,मटका व्यवसाय तेजीत,अवैध धंद्याने परिसर पोकरलाय ; अनेक कुंटूबे उध्वस्त होतायेत : पोलीसाची साथ पंटराना

0

Rate Card

संख,(वार्ताहर) : उमदी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या संख सह परिसरातील अनेक गावात अवैध धंदे जोमात सुरू असून याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोलीस आणि मटका व्यावसायिक यांच्यातील ‘मधूर’ संबंधातून मटका व्यवसायाला चालना दिली जात असल्याची चर्चा आहे. 

 हेही वाचा: माडग्याळकरांना पिण्याचे पाणीही विकत घेण्याची वेळ सलग चार वर्षापासून दुष्काळ कायम,शेतकऱ्यावर गाव सोडण्याची वेळ

जत तालुक्यातील संख येथे मटका व अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. परिसरातील अनेक गावात जत,संख येथून दुचाकीद्वारे दारू पुरविली जाते. दररोज मटका खेळल्या जातो.परिसरातील अनेक ठिकाणी आडोशाला हा मटका खुलेआम चालतो. रस्त्याने ये-जा करणार्‍यांच्या नजरेत दिसणारी गर्दी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेत कशी काय येत नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

 हेही वाचा: पाच कोटीच्या योजनेचा रोहयोचा मजूर ठेकेदार,संख पाणी योजना : अजब,गजब कारभाराने जनतेचे बेहाल

संख परिसरातील शेतकरी, मजूर आणि शालेय विद्यार्थी या मटक्याच्या आहारी गेले आहेत.सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू आहे. बँकाकडून व खासगी सावकारांकडून शेतकर्‍यांनी आर्थिक उचल केली आहे. मात्र शेतीसाठी उचल केलेल्या पीक कर्जाच्या रकमेची उधळपट्टी मटका, दारू या अवैध धंद्यावर शौकीन करत असल्याची खुद्द शेतकरी बांधवातच चर्चा आहे.

संखात पाण्यासाठी मरणयातना,योजनेचे पाणी संपले : क्षारयुक्त पाण्याने आजार बंळावले

या वाढत्या प्रकारामुळे मटक्यात पीक कर्जाची रक्कम गमावणार्‍यांची संख्या वाढून शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे चित्र या परिसरात आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी, तर अवैध धंद्याच्या अड्डय़ांवर प्रचंड गर्दी असते. मटका शौकीन दिवसभर मटक्याच्या आकड्यांची चातकासारखी वाट बघत असतात.

हेही वाचा ; उमदी | परिसरात अवैध धंद्यांना ऊत,मटका,दारूअड्डे बेधडक सुरु : सुभेदारी दिल्यासारखा पोलीसाचा कारभार |


शेतकरी, मजूर, विद्यार्थी दारू अड्डय़ांवर मद्य प्राशन करीत असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे. परिसरातील सर्वच गावांतून गावातील एका ठराविक व्यक्तीमार्फत मटक्याची रक्कम गोळा करणे, मटका लागल्यास पैसे घरपोच नेऊन देणे व कमिशन घेणे, अशी कामे होत असल्याची ग्रामस्थात चर्चा आहे. संबंधित बाबीवर नियंत्रण ठेवणारे पोलीस मात्र केवळ कर्तव्य बजावत आहेत.अवैध धंद्येवाल्यांच्या ‘अर्थ’पूर्ण भेटी घेऊन कोणतीही कारवाई करत नसल़्याने सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. दिवसागणिक वाढणार्‍या या अवैध धंद्यामुळे संख परिसरातील ग्रामस्थांचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. महिला वर्गाला विशेष मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.त्यातच काळे सोने असणाऱ्या वाळूचे मोठे कोठार भोर नदी व संख मध्यम प्रकल्प असल्याने तेथील वसूलीतर बेफामपणे केली जात आहे.सर्वच गावात अवैध धंद्याने ऊत आणला असून  अनेक युवक यामुळे वाम मार्गाला लागल्याने अनेक कुंटूबे उध्वस्त होत आहेत.

संख परिसरातील महसूली भार कमी करण्यासाठी अप्पर तहसिल कार्यालय झाल्याने पुन्हा संखवर ताण वाढणार अाहे.यापुढे अवैध व्यवसायात वाढ होण्याची शक्यता असल्याने संखला सुसज्ज पोलीस ठाणे व सहाय्यक पोलिस निरिक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.